Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्रभारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम, सोन्याच्या दरात मोठी घसरण; खरेदीसाठी सुवर्णसंधी

भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम, सोन्याच्या दरात मोठी घसरण; खरेदीसाठी सुवर्णसंधी

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. यामुळे पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा डाव हाणून पाडला आहे.

 

 

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आज (९ मे) सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरु शकते.

 

आज ९ मे रोजी २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमच्या भावात ११५० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ९०,३०० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे.

 

 

त्याचप्रमाणे, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १०० ग्रॅमच्या भावात ११,५०० रुपयांची घट झाली असून, तो ९,०३,००० रुपयांवर आला आहे.

 

विशेष म्हणजे, ८ मे रोजी सराफा बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली होती. त्यावेळी २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव ९१,४५० रुपये आणि प्रति १०० ग्रॅमचा भाव ९,१४,५०० रुपये होता.

 

 

सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमच्या भावात १२५० रुपयांची घसरण झाली असून तो ९८,५०० रुपयांवर आला आहे.

 

 

याव्यतिरिक्त, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १०० ग्रॅमच्या भावात १२००० रुपयांची मोठी घट झाली असून, तो ९,८५,००० रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा प्रति १०० ग्रॅमचा भाव ९,९७,५०० रुपये होता.

 

आज १०० ग्रॅम चांदीचा भाव ९९०० रुपये आहे. तर १ किलोग्रॅम चांदीच्या दराबद्दल बोलायचं झाल्यास, तो ९९,००० रुपयांवर आला आहे. ९ मे रोजी देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये १० ग्रॅम चांदीचा दर ९९० रुपये आहे.

 

 

सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने सोने खरेदीदारांसाठी ही चांगली संधी आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि बाजारातील अस्थिरता पाहता गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -