Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रभारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम; परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती

भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम; परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती

पाकिस्तानने काल रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेसह अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन म्हणजे झुंडीने ड्रोन्स पाठवले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठानकोटमध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने काऊंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये 50 पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले. मात्र आता भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा युद्धविराम घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मीसी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

पाकिस्तानकडून वारंवार चुकीची माहिती; धार्मिक स्थळाला टार्गेट केल्याचा खोटा आरोप

पाकिस्तानकडून वारंवार चुकीची माहिती पसरवण्यात आली असल्याचं आयोजित करण्यात आलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या पत्रकारपरिषदेत सांगण्यात आलं. तसेच भारताने कोणत्याही धार्मिकस्थळाला लक्ष्य केलं नसल्याचंही भारतीय तिन्ही दलाच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

हवाई दल, नौदल आणि भूदलाकडून युद्धविराम, दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार

गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. हवाई दल, नौदल आणि भूदलाकडून युद्धविराम करण्यात आलेला आहे. तिन्ही दलाकडून लष्करी कारवाई थांबवण्यात आली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम करण्यात आला आहे.

 

NSA अजित डोवाल पंतप्रधानांच्या भेटीला; युद्धविरामाबाबत डोवाल मोदींना सर्व माहिती देणार

NSA अजित डोवाल पंतप्रधानांच्या भेटीला गेले आहेत. अजित डोवाल पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. युद्धविरामाबाबत डोवाल मोदींना सर्व माहिती देणार आहेत. एकंदरीत भारत आणि पाकिस्तानमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी भारताने आपल्या अटींवर युद्धविराम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

दहशतवादाविरोधात आता भारत कुठलीही तडजोड करणार नाही: एस जयशंकर

भारत पाकिस्तानात युद्धविरामासंदर्भात आता एकमत झालेलं आहे, अशी माहिती एस जयशंकर यांनी दिलेली आहे. लष्करी कारवाई थांबवण्यावर सामंजस्य करार झाला आहे. तेसच दहशतवादाविरोधात आता भारत कुठलीही तडजोड करणार नाही

 

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम; दोन्ही देशांची 12 तारखेला डीजीएमओमध्ये चर्चा होणार

भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा युद्धविराम घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मीसी यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता याबाबत दोन्ही देशांची 12 तारखेला डीजीएमओमध्ये चर्चा होणार आहे. आज दुपारी 3.35 मिनिटांनी पाकच्या डीजीएमओंनी भारताच्या डीजीएमओंना फोन केल्याचंही म्हटलं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -