Saturday, October 12, 2024
Homeसांगलीसांगली : प्रियकराच्या मदतीने महिलेनेच केला पतीवर कोयत्याने हल्ला

सांगली : प्रियकराच्या मदतीने महिलेनेच केला पतीवर कोयत्याने हल्ला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

तालुक्यातील हिवतड येथे प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीवर कोयत्याने हल्ला केला.शुक्रवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात राजाराम मंडले (वय 40) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी त्यांची पत्नी सुलाताई आणि तिचा प्रियकर वैभव पवार यांच्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजाराम मंडले यांची पत्नी सुलाताई ही टेंभू योजनेच्या कालव्याजवळच्या पुलाजवळ शुक्रवारी मध्यरात्री प्रियकर वैभव पवार याच्यासोबत बोलत बसली होती. त्यावेळी राजाराम तिथे गेला. त्याने पत्नीला जाब विचारला. दोघांची जोरदार वादावादी झाली. वैभव पवार आणि सुलाताई यांनी राजाराम यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. पवार याने राजाराम याला धरून खाली पाडले आणि सुलाताई हिने कोयत्याने त्याच्यावर वार केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -