पहलगाव दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी आणि दहशतवाद्यांचा कट रचणाऱ्यांना भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे धडा शिकवला. पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची 9 तळ नष्ट केली. ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी थेट जवानांना जाऊन भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी जवानांसोबत संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्यांनी हवाई दलातील शूर सैनिकांशीही संवाद साधला. यावेळी हवाई दलाच्या जवानांनी सद्यस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. या दौऱ्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. एका छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे एक भारतीय लढाऊ विमान दिसत आहे. त्यावर लिहिले आहे की, शत्रूचे पायलट नीट झोपू शकले नाहीत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जाऊन पाकिस्तानसह संपूर्ण जगाला एक संदेश दिला. संपूर्ण देश सैनिकांसोबत आहे. जो कोणी भारताकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत केली तर त्याला धूळ चारली जाईल.
मोदी आदमपूर एअरबेसवर का गेले?
आदमपूर एअरबेस देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एअरबेस आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूर एअरबेस चर्चेत आले होते. पाकिस्तानकडून या एअरबेसवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. भारतीय हवाई दलाच्या जवानांनी हा हल्ला निकामी केला. पाकिस्तानकडून 10 मे रोजी ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे या एअरबेसवर हल्ला झाला होता. परंतु तो परतवून लावत भारताने पाकिस्तानच्या अनेक सैनिक ठिकाणांवर हल्ले केले. त्यामुळे या एअरबेसवरील जवानांची नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या संदर्भातील काही फोटो ‘एक्स’ वर टाकण्यात आले. त्यात नरेंद्र मोदी यांनी लिहिली की, मी सकाळी आदमपूर एअरबेसवर गेलो. त्या ठिकाणी हवाई दलातील सैनिकांची भेट घेतली. त्यांचे धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयता याला सॅल्यूट केले. त्यांच्यासोबत राहण्याचा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे त्याबद्दल भारत त्यांचा सदैव ऋणी राहील.