१३ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांचा अॉनलाइन निकाल जाहीर करण्यात आला.
अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळाले असून, काहींनी तर १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर काही विद्यार्थी काठावर पास झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यी अनुवर्तीण देखील झाले आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये दहावीच्या परीक्षेत ३९ टक्के इतके कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलंत आत्महत्या केली आहे. कमी गुण मिळाले म्हणून आलेल्या नैराश्यातून विद्यार्थीनीने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना चऱ्होली फाटा येथील एका सोसायटीत मगंळवारी (दि. १३) मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुप्रजा हरी बाबू (वय १६) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
मंंगळवारी दुपारी एकच्या सुमारास तिने मोबाईलवर निकाल पाहिला. काही वेळाने ती बेडरूमध्ये गेली. बराच वेळ ती बाहेर न आल्याने तिच्या आईने जाऊन पाहिले असता ती साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. शेजारच्या रहिवाशांनी पोलिसांना याबाबात कळवले. सुप्रजाला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.