राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकामी वीज कोसळल्याच्या घटना घडत आहेत. नांदेडमध्ये धावत्या दुचाकीवर वीज कोसळून एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला.
नांदेडच्या माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात दुपारी ही घटना घडली. खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने वीज कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच जागीच मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज दुपारी ३ वाजता ही घटना घडली. नांदेडमध्ये आज विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. यादरम्यान धावत्या दुचाकीवर वीज कोसळली आणि शिक्षकाचा मृत्यू झाला.
संजय पांडे असं मृत शिक्षकाचे नाव आहे. संजय पांडे हे आपल्या करंजी या गावाकडे दुचाकीने जात होते. वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात संजय पांडे यांचा रस्त्यात जागीच मृत्यू झाला. दरम्यान, खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने त्यांच्या अंगावर वीज पडल्याचा अंदाज व्यक्त जात आहे.
पावसाळी वातावरणात मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासन करत असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. संजय पांडे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटु्ंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनामुळे करंजी या गावावर शोककळा पसरली आहे.