Thursday, November 13, 2025
Homeब्रेकिंगपत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; 'या' कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल

होलसेल फळ विक्रेता असलेल्या एकाने कर्जबाजारी पणाला कंटाळून पत्नीचा मारहाण व गळा दाबून खून केला आहे. नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

वाघोलीतील मांजरी खुर्द परिसरात ही घटना घडली आहे. नागनाथ वसंत वारूळे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तर, उज्वला नागनाथ वारूळे (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, वारूळे कुटूंब मुळचे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आहे. नागनाथ वारूळे व उज्वला यांचा दुसरा विवाह झाला आहे. नागनाथ यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. तर, उज्वला यांना पहिल्या पतीपासून तीन मुले आहेत. नागनाथ हे कर्जबाजारी होते. गावी देखील त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्या लहान भावांनी त्यांना पुण्यात आणले होते. त्यांचे कर्ज भेडण्यास देखील सुरूवात केली होती. त्यांनी त्यालाही फळ विक्रीचा व्यावसाय सुरू करून दिला होता.

 

नागनाथ व उज्वला हे दोघेच वाघोलीतील मांजरी खुर्द परिसरात राहत होते. लहान भावाच्या इमारतीत राहत होते. दरम्यान, मंगळवारी रात्री त्यांच्या खोलीत पाहिले असता पत्नी बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. तर, नागनाथ यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. याघटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हांडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास केल्यानंतर नागनाथ यांनी पत्नीचा गळा आवळून तसेच मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -