देशातील आघाडीचा टेलिकॉम ब्रँड Reliance Jio ने OTT प्रेमींसाठी भन्नाट आणि बजेटमधला धमाकेदार प्लॅन सादर केला आहे. फक्त 100 रुपयांमध्ये आता मिळणार आहेत थेट 299 रुपये किमतीच्या रिचार्जचे फायदे म्हणजेच मोफत JioCinema Premium सबस्क्रिप्शन आणि 5GB डेटा, तेही संपूर्ण 90 दिवसांसाठी.
100 रुपयांमध्ये काय फायदा मिळणार?
डेटा 5GB
OTT- JioCinema Premium मोफत (मोबाईल आणि टीव्हीवर दोन्हीवर चालणारे)
वैधता – 90 दिवस
मूळ किंमत – 100 रुपये
खरे किंमतीचे फायदे – 299 रुपये
पूर्वी JioCinema Premium सबस्क्रिप्शनसाठी कमीत कमी 299 रुपयांचा प्लॅन आवश्यक होता. मात्र आता हेच प्रीमियम सबस्क्रिप्शन 100 रुपयांच्या बजेट प्लॅनमध्ये मिळणार आहे, जे वापरकर्त्यांना टीव्हीवर आणि मोबाईलवर सिनेमे, वेब सिरीज आणि लाईव्ह स्पोर्ट्स पाहण्याची मुभा देते तेही कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता.
महत्वाच्या अटी लक्षात ठेवा
हा 100 रुपये प्लॅन बेस प्लॅन नाही, म्हणजेच तो एक बूस्टर किंवा अॅडऑन प्लॅन आहे.
या प्लॅनने तुमचे सिम सुरू राहत नाही. तुम्हाला अॅक्टिव बेस प्लॅन असणं आवश्यक आहे. तरीही, OTT साठी ही एक परवडणारी संधी आहे.
OTT प्रेमींसाठी सर्वोत्तम पर्याय
जर तुम्ही Jio वापरकर्ता असाल आणि तुम्हाला स्वस्तात दर्जेदार कंटेंट पाहायचा असेल तर हा 100 रुपायांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. JioCinema Premium सह मिळणारे 90 दिवसांचे मनोरंजन आणि 5GB डेटा हे सगळं मिळवणं आता अगदी सहज शक्य आहे.