आजाराला कंटाळूवेगाव येथील एका युवकाने उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वेगाव येथे घडली. दीपक भास्कर रामटेके (वय 25) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
दीपक हा काही दिवसांपासून आजारी होता. अशातच शुक्रवार, 16 मे रोजी सकाळी 10 वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून तो घरून निघून गेला. संध्याकाळ झाली तरी तो घरी परत आला नाही. रात्री उशीर झाल्यानंतरही तो परत न आल्याने घरच्या मंडळींनी सगळीकडे शोधाशोध केली. तो कुठेही दिसून न आल्याने शेवटी शनिवार, 17 मे रोजी सकाळी 7 वाजता गावातील एका शेतामध्ये उंबराच्या झाडाला दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.दीपकने फाशी घेतल्याची वार्ता गावात पसरताच अनेकांनी शेताकडे धाव घेतली. वेगावच्या पोलिस पाटलांनी मारेगाव पोलिस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दीपकच्यामागे आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. या घटनेचा तपास मारेगाव पोलिस करीत आहेत.