Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरदारूच्या बाटल्या, प्लास्टिकने जंगले व्यापली!

दारूच्या बाटल्या, प्लास्टिकने जंगले व्यापली!

जागोजागी पडलेल्या दारूच्या बाटल्या, बाटल्या फोडल्याने झालेला काचांचा खच, प्लास्टिक बॉटल अन् स्नॅक्सच्या पॅकेट्सचे प्लास्टिक आणि घरातील टाकाऊ वस्तूंच्या ढिगार्‍यांमध्ये जंगले, डोंगरदर्‍या अन् मुक्या जनावरांसाठीची पाणस्थळे हरवली आहेत. निसर्गाचे अपरिमित विद्रूपीकरण आजही सुरूच आहे. वन्यप्राण्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे कचर्‍यासह विविध प्रकारच्या समस्यांचा स्थानिक ग्रामस्थांसह वन्यप्राण्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोल्हापूर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांनी तळ ठोकला आहे. गवा, हत्ती, बिबटे व तत्सम वन्यजीव लोकवस्तीत येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याला माणूसच कारणीभूत असल्याचे वास्तव आहे. माणूस आपल्या मनोरंजनासाठी, दगदगीतून काहीकाळ विश्रांतीसाठी आणि अभ्यास व तत्सम कारणांसाठी पर्यटन करतो.

अभयारण्ये, जंगले, धरण क्षेत्र, पाणस्थळ, गडकोट-किल्‍ले अशा ठिकाणी लोक सहलीला प्राधान्य देतात. मात्र, यापैकी बहुतांशी पर्यटक स्वत:च्या मनोरंजनासाठी जंगल, पाणस्थळ परिसरात दारू पिऊन गोंधळ करतात. साऊंड सिस्टीम लावून नाच-गाणे करतात. या आवाज व आरडाओरडण्याचा त्रास जंगली प्राण्यांना सहन करावा लागतो. या आवाजाने वन्यजीव बिथरतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -