शिरोळ येथे राजू मुरलीधर कोलप (वय 32, रा. निलजी बामणी, ता. मिरज, जि. सांगली) याचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. मंगळवारी शिरोळ पोलिसांनी या खुनाचा छडा लावला.
एका अल्पवयीन मुलाने मोबाईलवर रिल्स ठेवले होते. असे रिल्स का ठेवले आहे, याचा जाब कोलप याने त्याला विचारल्याने वाद झाला होता.यातूनच सांगलीच्या एका अल्पवयीन व अन्य एका अल्पवयीन अशा दोघांनी शिरोळ येथे धारदार व तीक्ष्ण हत्याराने शरीरावर ठिकठिकाणी वार करून खून केल्याचा छडा शिरोळ पोलिसांनी लावला आहे. या दोघांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत.