नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 1 ऑगस्ट 2025 पासून UPI मध्ये नवीन API नियम लागू करणार आहे. या नव्या बदलामुळे युपीआय युजर्सची अनेक सेवासुविधा बंद होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बँका आणि पेटीएम, फोनपे सारख्या पेमेंट सेवा पुरवठादारांना नव्या सेवांसंदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. याचा परिणाम बँक बँलन्स चेक करणे, ऑटोपे आणि ट्रांझक्शन स्टेटस चेक सारख्या सेवांवर परिणाम होणार आहे. चला तर पाहूयात १ ऑगस्ट २०२५ पासून काय बदल होणार आहे हे पाहूयात….
बॅलन्सची माहीतीवर अंकुश
युपीआय यूजर्स आता दिवसातून एकदा कोणत्याही UPI एपवरुन ५० वेळाच बॅलन्स चेक करु शकतो. जर तुम्ही दोन एप्स वापरत असाल तर दोन्ही एपमध्ये ५०-५० वेळा चेक करु शकता.त्याहून जास्त वेळ आता तुम्हाला बॅलन्सची माहीती मिळणार नाही.
ऑटोपे पेमेंट्ससाठी वेळेचे बंधन
पीक अवर्समध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ आणि रात्री ९.३० वाजेपर्यंत ऑटोपे पेमेंट्स करता येणार आहे. यामुळे आता ऑटोपे शेड्युलमध्ये वाट पाहावी लागणार आहे.
ट्रांझक्शन स्टेटस चेक करणे
युपीआय पेमेंटचे ट्रांझक्शन जर कोणत्याही विशेष कारणे फेल झाले. जसे नेटवर्क इश्यु वगैरे तर वारंवार स्टेटस चेक करण्याची api सुविधा बंद होणार आहे. युजर्सना आता त्यांचे पेमेंट फेल झाले आहे की नाही याची माहीती लागलीच मिळणार नाही.
लिस्ट अकाऊंटची डिटेल्स
यूजर्सना त्यांच्या मोबाइल नंबरशी लिंक्ड अकाऊंट्सची लिस्ट एका एपवरुन केवळ एका दिवसात केवळ २५ वेळा चेक करता येणार आहे.ही रिक्स्वेस्ट देखील तेव्हाच कामी येईल जेव्हा युजर बँकेची निवड करेल आणि बँकेची सहमती असेल तेव्हा ही सुविधा वापरता येणार आहे.
NPCI ने बँकांना आणि PSPs ना आदेश दिला आहे की त्यांनी युजरच्या API वापरावर लक्ष ठेवावे अन्यथा एपीआय निर्बंध ,पेनल्टी आणि नवे कस्टमर जोडण्यावर बंदी येऊ शकते. सर्व PSPs ना ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सिस्टीमचे ऑडीटचे अंडरटेकींग द्यावे लागणार आहे. या बदलामुळे युजर्सना वारंवार बॅलन्स चेक, ऑटो पे सेटअप वा स्टेटस चेक करताना अडचणी येऊ शकतात. हे नियम सिस्टीम सोपी आणि सुरक्षित बनविण्यासाठी केले आहेत असे NPCI यांनी म्हटले आहे.






