Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्र10 रुपयांच्या नाण्यांबाबत RBIने नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जारी, दुकानदारांना इशारा

10 रुपयांच्या नाण्यांबाबत RBIने नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जारी, दुकानदारांना इशारा

देशभरात अनेक ठिकाणी दहा रुपयांचे नाणे नाकारले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठा निर्णय घेत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वं (गाइडलाइन्स) जाहीर केली आहेत. RBI ने ठामपणे सांगितले आहे की, दहा रुपयांचे सर्व नाणी वैध (Legal Tender) असून देशभरात कोठेही (RBI) त्याचा स्वीकार न करणे हा कायद्याचा भंग ठरतो.

 

चुकीच्या अफवांना लगाम

RBI ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, आजवर १४ विविध डिझाईन्समध्ये ₹10 ची नाणी चलनात आणली गेली आहेत, आणि ती सर्व नाणी पूर्णपणे वैध आणि स्वीकारार्ह आहेत. कोणतीही संस्था, दुकानदार किंवा नागरिक यांना ही नाणी स्वीकारण्यास नकार देता येणार नाही.

 

नाकारल्यास कायदेशीर कारवाई

दुकानदार, व्यापारी किंवा एखादी संस्था जर ₹10 चे नाणे घेण्यास नकार देतात, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. RBI ने याबाबत सर्व नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

 

कसे ओळखाल खरे ₹10 चे नाणे?

 

1. नाण्याचा डिझाईन

 

 

समोर: अशोक स्तंभ, “भारत” आणि “India”

मागे: ₹10, तसेच विविध प्रतीक जसे कमळ, इत्यादी

2. धातू व रंग

 

बाय-मेटॅलिक: बाहेरील भाग – अ‍ॅल्युमिनियम ब्रॉन्झ, आतील भाग – निकेल ब्रॉन्झ

चमकदार आणि एकसमान रंग

3. वजन व आकार

 

असली नाणी संतुलित वजनाची असतात

4. पडल्यावर आवाज

 

खरी नाणी टणक आवाज करतात, नकली नाणी खोखला आवाज करतात

5. चुंबकीय प्रभाव

 

खरी नाणी थोडीफार चुंबकीय असतात

हेल्पलाइन सेवा

जर कोणाला शंका असेल की नाणे खरे आहे की नाही, तर RBI ने टोल-फ्री क्रमांक 14440 उपलब्ध करून दिला आहे. यावर कॉल केल्यानंतर IVR प्रणालीद्वारे नाण्याची ओळख पटवण्यासाठी संपूर्ण माहिती दिली जाते. दहा रुपयांचे नाणे न स्वीकारणे ही केवळ अज्ञानतेची बाब नाही, तर ती कायदा मोडण्याची कृती देखील आहे. RBI च्या या स्पष्ट घोषणेनंतर देशभरातील सर्व दुकानदार, व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी हे नाणे विनासंकोच स्वीकारावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -