Wednesday, December 17, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला नमवलं, क्वॉलिफायर 2 मध्ये एन्ट्री

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला नमवलं, क्वॉलिफायर 2 मध्ये एन्ट्री

आयपीएल 2025 स्पर्धच्या एलिमिनेटर फेरीत मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला 20 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 228 धावा केल्या. मुंबईसाठी रोहित शर्मा याने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने गुजरातसमोर विजयासाठी 229 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर गुजरात टायटन्सला 208 धावांपर्यंतच पोहचचा आलं. मुंबई इंडियन्सने या विजयासह क्वॉलिफायर 2 मध्ये एन्ट्री मारली आहे. क्वॉलिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 1 जून रोजी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत धडक मारेल. अंतिम फेरीत आरसीबीशी लढत होईल. अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे.

 

इंडियन्सने गुजरात टायटन्सला नमवलं, क्वॉलिफायर 2 मध्ये एन्ट्री

आयपीएल 2025 स्पर्धेच्या एलिमिनेटर फेरीत मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला धावांनी पराभूत केलं. मुंबई इंडियन्सने 228 धावा करत विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या दोन षटकात 12 चेंडूत 36 धावांची गरज होती. पण बोल्टने हे षटक जबरदस्त टाकलं आणि शेवटच्या षटकात 24 धावा ठेवल्या. गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात फक्त 4 धावा करता आल्या. यासह मुंबई इंडियन्सने गुजरातचा 20 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने क्वॉलिफायर 2 फेरीत एन्ट्री मारली आहे. क्वॉलिफायर पंजाब किंग्सशी लढत होणार आहे. या सामन्यात विजयी संघ अंतिम फेरीत आरसीबी दोन हात करणार आहे.

 

मोक्याच्या क्षणी रदरफर्ड आऊट

गुजरात टायटन्सला 12 चेंडूत 36 धावांची गरज होती. बोल्टने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर रदरफर्डने जोरदार फटका मारला. पण सीमा पार काही होऊ शकला नाही. तिलक वर्माने त्याचा अप्रतिम झेल पकडला. रदरफर्ड झेलबाद होत तंबूत परतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -