Saturday, February 14, 2026
Homeकोल्हापूरसायबर भामट्यांकडून एकाच दिवशी 14 कोटींचा गंडा

सायबर भामट्यांकडून एकाच दिवशी 14 कोटींचा गंडा

निवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांची 3 कोटी 57 लाखांची फसवणूक करणार्‍या सायबर चोरट्यांनी मंगळवारी, दि. 27 मे रोजी एकाच दिवसात दहा बँक खात्यांमधून अनेक बड्या व्यक्ती, संस्थांना सुमारे 13 ते 14 कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार राजारामपुरी पोलिस व सायबर क्राईम पथकाच्या चौकशीतून पुढे आला आहे.

 

सायबर भामट्यांचे रॅकेट देश-विदेशातही कार्यरत असावे, असाही तपासाधिकार्‍यांचा संशय आहे. संयुक्त चौकशी पथकाने संशयितांचा छडा लावण्यासाठी चौकशीची व्याप्ती वाढविली आहे.

 

निवृत्त प्राध्यापिका डोंगरे यांच्या फसवणुकीत बनावट बँक खात्याचा वापर झाल्याचाही प्रकार उघड होत आहे. सिम कार्डच्या मालकांचा तपास पथकांना सुगावा लागला नसल्याचे सांगण्यात आले. आर्थिक गुंतवणुकीच्या गुन्ह्यात डिजिटल अटक करण्याची धमकी देऊन डोंगरे यांना गंडा घातल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्याने कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

 

डोंगरे यांचे पैसे जमा झालेली बँक खाती बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश राज्यांतील असल्याचेही पोलिस निरीक्षक तथा तपासाधिकारी सुशांत चव्हाण यांनी सांगितले. यामधील 10 खात्यांवरील 27 मे रोजी 13 ते 14 कोटींची रक्कम संशयितांनी इतर खात्यावर वर्ग केली. कंपन्या आणि संस्थांच्या नावे असलेली सर्वच खाती बोगस कागदपत्रांच्या आधारे काढण्यात आली आहेत, असेही चौकशीतून स्पष्ट होत आहे. भामट्यांनी डोंगरे यांच्या फसवणुकीसाठी वापरलेले सर्वच मोबाईल सध्या स्विचऑफ लागत असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -