Saturday, February 14, 2026
Homeकोल्हापूरशनिवार पेठेत अठरा तोळे दागिन्यांची चोरी

शनिवार पेठेत अठरा तोळे दागिन्यांची चोरी

शनिवार पेठ येथील सोन्या मारुती चौक, पद्माराजे गल्ली या मध्यवर्ती परिसरात शुभांगी सुजय म्हेत्रे यांच्या घरातील कपाटात असणार्‍या लॉकरमधील 18 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखाची रोकड चोरट्याने लंपास केली.

 

शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, एका महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

 

शहरातील वर्दळीच्या परिसरात 25 ते 31 मे या काळात हा प्रकार घडला असून नागरिकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॉकरमधून 6 लाख रुपये किमतीच्या 12 तोळ्याच्या पाटल्या, दोन लाख रुपये किमतीचे चार तोळ्याचे हातातील कडे, डायमंडची अंगठी, 2 तोळ्याच्या सोन्याच्या 3 अंगठ्याशिवाय एक लाखाची रोख रक्कम चोरट्याने लंपास केली.

 

म्हेत्रे यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम असल्याने त्यांनी बँक लॉकरमध्ये ठेवलेले दागिने घरी आणले होते. कार्यक्रम झाल्यानंतर तूर्त कपाटात ठेवले होते. सोमवारी, मंगळवारी लॉकरच्या किल्ल्या कपाटाजवळ होत्या. त्याचाच फायदा घेऊन संशयिताने हे केले असावे, असा संशय आहे. ताब्यात घेतलेल्या महिलेकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -