Saturday, January 17, 2026
Homeब्रेकिंगदर्शनासाठी गेले पण परतलेच नाहीत, एकाच घरातील ३ चिमुकल्यांचा मृत्यू,

दर्शनासाठी गेले पण परतलेच नाहीत, एकाच घरातील ३ चिमुकल्यांचा मृत्यू,

जालन्यातील बेपत्ता असलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जाफ्राबाद तालुक्यातील वरुड गावात ही खळबळजनक घटना घडली.

 

एकाच घरातील ही तिन्ही चिमुकले काल सकाळपासून बेपत्ता होते. ते महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले पण घरी परतले नाहीत, आज या तिन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यात आढळले. या घटनेमुळे जोशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

 

जालन्यातील जाफ्राबादतालुक्यातील वरुड येथील बेपत्ता असलेल्या तिन्हीही लहान मुलांचा शेततळयात बुडून मृत्यू झालाय. वरुड गावातील शेततळयातच ही घटना घडली आहे. हे तिन्हीही मुलं काल सकाळी महादेव मंदिरात दर्शनासाठी जातो, म्हणून घराबाहेर पडले होते. काल रात्रीपर्यंत ते घरी न आल्यानं त्यांच्या शोध सुरु झाला होता. १४ वर्षीय यश जोशी,७ वर्षीय रोहण जोशी आणि ९ वर्षीय दिपाली जोशी अशी शेततळ्यात बुडून मयत झालेल्या मुलांची नावं आहेत. हे तिन्हीही मुलं एकाच कुटुंबातील असून या घटनेमुळे वरूडसह परीसरात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -