Wednesday, July 23, 2025
Homeक्रीडाचेंगराचेंगरीत 11 जणांच्या मृत्यूवर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया

चेंगराचेंगरीत 11 जणांच्या मृत्यूवर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया

बंगळुरुत आयपीएल चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विक्ट्री परेड दरम्यान काल चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत RCB च्या 11 चाहत्यांनी आपले प्राण गमावले. काल एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या आत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन सुरु होतं. विराट कोहलीसह अन्य क्रिकेटर्स हसताना, आनंद साजरा करताना दिसत होते. त्याचवेळी स्टेडियमच्या बाहेर ही चेंगराचेंगरीची घटना घडली. विराट कोहली चेंगराचेंगरीच्या या दुर्देवी घटनेवर प्रतक्रिया व्यक्त करताना म्हणाला की, ‘माझं मन मोडलय, मी निशब्द झालोय’. आरसीबीने सुद्धा या दुर्घटनेवर अधिकृत स्टेटमेंट दिलय. ‘आम्हाला या दुर्घटनेच दु:ख आहे. आम्ही सर्व दिशा-निर्देश आणि सल्ले ऐकले’ असं आरसीबीने म्हटलं. प्रशासनाकडून जशी आम्हाला परिस्थितीबद्दल माहिती मिळाली, आम्ही आमच्या शेड्यूलमध्ये बदल केल्याच आरसीबीकडून सांगण्यात आलं.

 

“आम्हाला बंगळुरुमध्ये आज दुपारी मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून दुर्घटनेबद्दल माहिती मिळाली. आम्हाला खूप दु:ख झालं. सर्वांची सुरक्षा आमच्यासाठी पहिली प्राथमिकता आहे. या दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले, त्याबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. आमच्या संवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत. माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या कार्यक्रमात बदल केला. स्थानिक प्रशासनाच्या सूचना आणि सल्ल्याच पालन केलं. आम्ही आमच्या सर्व समर्थकांना सुरक्षित राहण्याच आवाहन केलं” असं आरसीबीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

 

सचिन तेंडुलकरने काय म्हटलं?

 

आरसीबीने भले पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली, पण बंगळुरुमधल्या दुर्देवी घटनेने अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच मन मोडलं. सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, हरभजन सिंग सारख्या खेळाडूंनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. “बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जे झालं, ते अकल्पनीय आणि त्रासदायक आहे. या घटनेने प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. सर्वांसाठी शांतता आणि शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करतो” असं सचिन तेंडुलकरने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

अनिल कुंबळेने काय लिहिलं?

 

क्रिकेटसाठी दु:खद दिवस असं अनिल कुंबळेने लिहिलय. “आरसीबीच्या विजयाच सेलिब्रेशन करताना ज्या लोकांनी आज प्राण गमावले, त्यांच्यासाठी माझं मन रडतय. जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा यासाठी प्रार्थना करतो” असं अनिल कुंबळेने म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -