लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली, तब्बल 232 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते महायुतीमध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र आहे, महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत.
दरम्यान आता काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा नेता आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. येत्या 12 जूनला सानंदा हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला अखेरची घरघर लागली आहे. मागील तीन महिन्यांमध्ये या जिल्ह्यातून काँग्रेस पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान आता काँग्रसला बुलढाणा जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे, खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे, ते लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश कणार आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार सानंदा हे येत्या 12 जूनला आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. सानंदा यांनी आपल्या प्राथमिक सदस्यात्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. ते आता येत्या 12 जूनला खामगावमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सानंदा यांनी सलग 15 वर्ष आमदार म्हणून खामगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनित्व केलं आहे, मात्र त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, ते आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.