Home मनोरंजन आमीरची आई वयाच्या 91 व्या वर्षी सिनेमात दिसणार, लेकाच्या सिनेमातून पदार्पण करणार!

आमीरची आई वयाच्या 91 व्या वर्षी सिनेमात दिसणार, लेकाच्या सिनेमातून पदार्पण करणार!

0
आमीरची आई वयाच्या 91 व्या वर्षी सिनेमात दिसणार, लेकाच्या सिनेमातून पदार्पण करणार!

मिस्टर परफेक्शनिस्ट” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खान (Aamir Khan) यांच्या आई जीनत हुसैन (Zeenat Hussain) या वयाच्या 91 व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत, आणि तेही स्वतः त्यांच्या मुलाच्या चित्रपटातून… एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांनी आमिर खान (Aamir Khan) यांना विनंती केली, आणि त्यानंतर आमिरने स्वतःच्या आईशी या भूमिकेसाठी चर्चा केली. विशेष म्हणजे, आमिर खान यांची बहीण निखत खान सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. 13 जून रोजी जीनत हुसैन यांचा 91 वा वाढदिवस आहे.

 

आईने पहिल्यांदाच पाहिली शूटिंगची प्रक्रिया

आमिर खान यांनी सांगितलं की, त्यांच्या आईने कधीही चित्रपटाचं शूटिंग प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. मात्र, जेव्हा ‘तारे ज़मीन पर’ चित्रपटाचं शूटिंग चालू होतं, तेव्हा त्यांची आई जीनत हुसैन यांनी लोकेशनवर येऊन पाहण्याची इच्छा व्यक्त केली की चित्रपटं कसे तयार होतात. त्यावेळी ‘हॅप्पी वेडिंग साँग’चं शूटिंग सुरू होतं.

 

आमिर म्हणाला, “प्रसन्ना माझ्याकडे आले आणि म्हणाले – ‘सर, तुम्हाला चालत असेल तर अम्मींना एका सिनेमात छोटासा रोल करण्यासाठी विचाराल का? हे चित्रपटातलं शेवटचं गाणं आहे, आणि हे एक वेडिंग सेलिब्रेशन सिक्वेन्स आहे.”

तेव्हा ‘तू वेड्या झालाय का?’ अशी आमिरची प्रतिक्रिया होती.

 

प्रसन्ना यांनी स्पष्ट केलं की जीनत हुसैन एका पाहुण्याच्या भूमिकेत सहज सामावू शकतात. हे त्यांच्या दृष्टीने एक भावनिक क्षण ठरेल. कारण त्या खरोखरच एका चित्रपटाचा भाग बनायचं स्वप्न पाहत होत्या.

 

आमिर खान म्हणाले, “मी प्रसन्नाला लगेचच उत्तर दिलं – ‘तू वेड्या झालाय का? माझी हिंमत होणार नाही अम्मींना विचारायची, की एका सीनसाठी काम कर म्हणून. त्या फार हट्टी आहेत. त्या ऐकणारच नाहीत. वेळ वाया घालवू नकोस.’ पण तो वारंवार मला सांगत राहिला की एकदा विचार तरी करून बघ.”

 

आईचं होकार हा एक आश्चर्याचा क्षण

 

आमिरने पुढे सांगितलं, “मग मी अम्मींना विचारलं – ‘प्रसन्ना सांगतोय की एक पाहुणी म्हणून तुम्ही एक सीन करशील का?, चालेल का?’ आणि त्यांनी सरळ उत्तर दिलं – ‘हो, ठीक आहे.’ मी थक्क झालो. आणि अशा प्रकारे त्या दोन-तीन शॉटसाठी चित्रपटात झळकल्या. हा माझा एकमेव चित्रपट आहे ज्यात माझ्या अम्मी झळकल्या आहेत.”

 

चित्रपटात जेनेलिया देशमुखही

या चित्रपटात जेनेलिया देशमुख या देखील आहेत, ज्या आमिर खान यांच्या प्रेमिकेची भूमिका साकारत आहेत. चित्रपट 20 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.