मागच्या काही महिन्यापासून खाद्यतेलाचे गगनाला भिडले असून यामुळे सर्वसामान्य लोकांचे किचन बजेट कोलमडले आहे. अशातच केंद्र सरकारने कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.
यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहे.
केंद्राने तेलावरील सीमा शुल्क कमी केल्यांनतर तत्काळ प्रभावी झालेल्या या निर्णयामुळे खाद्य तेलांच्या दरात १० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.भारत आपल्या खाद्यतेलाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त गरजा आयातीद्वारे पूर्ण करतो. सध्या बाजारात मंदी असल्याने तेलाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. एक ते दीड महिन्यांनंतर मात्र तेलाच्या दरात बदल होण्याची शक्यता असल्याचे तेलाचे व्यापारी पीयूष बियाणी यांनी सांगितले.
खाद्य तेलाचे किलोचे दर
सोयाबीन : पूर्वीचे दर १३५ ते १४०….. आताचे दर १२५
शेंगदाणा : पूर्वीचे दर २००….. आताचे दर १९०
सूर्यफूल : पूर्वीचे दर १६०….. आताचे दर १५० ते १५५
तीळ : पूर्वीचे दर २५०….. आताचे दर २३०
पाम : पूर्वीचे दर १३५ ते १४०….. आताचे दर १२५



