Thursday, July 24, 2025
Homeइचलकरंजीहातकणंगले : अनैतिक संबंधातून महिलेचा डोक्यात हातोडा घालून खून

हातकणंगले : अनैतिक संबंधातून महिलेचा डोक्यात हातोडा घालून खून

अनैतिक संबंधातून विवाहित महिलेच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याची घटना सांगली – कोल्हापूर रस्त्यावर रूकडी फाट्या शेजारी असलेल्या हॉटेल सागरिका मध्ये गुरुवारी घडल्याचे उघडकीस आले.

 

सुमन सुरेश सरगर (वय ३५) मुळगाव जत सध्या राहणार उचगाव असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आदम गौस पठाण रा. घुणकी (ता. हातकणंगले) असे संशयीत आरोपीचे नाव असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हातकणंगले ग्रामीण रुग्नालयात पाठवून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.

 

 

 

सुमन सरगर हि विवाहित असून तिची व संशयीत आदम गौस पठाण याची एका कार्यक्रमात ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन संशयीत आदम गौस पठाण

 

त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू होते. यातून पठाण याने सुमन हिच्या कडून सात लाख रुपये उकळले होते. त्या पैशाची ती सातत्याने मागणी करत होती याचा राग पठाण याच्या मनात होता. यातून त्याने गुरुवारी दुपारी गोडी गुलाबीने सागरीका लॉज येथे घेऊन आला. याठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. यातून पठाण याने तिच्या डोक्यात हातोड्याने मारहाण केली. यामध्येच तीचा मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरी दोघेही लॉजिंगच्या खोलीतून बाहेर न आल्याने लॉजिंगच्या कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यामुळे संबंधीत प्रकार उघडकीस आला. ही घटना बघून संबंधीत कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून या घटनेची माहिती पोलीसांना दिली पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्नालयात नेला.

 

या गुन्ह्याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत हातकणंगले पोलीसात चालु होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -