Wednesday, July 23, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर हादरलं! वाढदिवसादिवशी किरकोळ वाद आणि धारदार विळ्याने केले पत्नीवर वार, स्वतःचाही...

कोल्हापूर हादरलं! वाढदिवसादिवशी किरकोळ वाद आणि धारदार विळ्याने केले पत्नीवर वार, स्वतःचाही संपवला जीव,

कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सावे गावात एक धक्कदायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी घरगुती किरकोळ वादातून पतीने पत्नीवर धारधार विळ्याने वार केले. यानंतर त्याने स्वतःच गळा चिरून आत्महत्या केली.

 

ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. मृतकाचे नाव कृष्णा शिवाजी झेंडे (वय 47) आणि राधिका झेंडे असे आहेत.

 

नेमकं काय प्रकार?

 

कृष्णा झेंडे हे मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीला होते आणि काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गावी आले होते. कृष्णा झेंडे यांचा काल (शुक्रवारी 13 जून) रोजी वाढदिवस होता. सावे गावातील तरुणांच्या मोबाइलवर व सोशल मीडियावर कृष्णा झेंडेंचे फोटो झळकत होते. घरामध्ये वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच घरात पत्नी राधिका हिच्यासोबत वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर कृष्णा यांनी गवत कापण्याच्या विळ्याने राधिकावर चार ते पाच वार केले. पत्नी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून कृष्णा यांनी स्वतःच गळा चिरून जीवन संपवलं.

 

शेजारच्यांनी घटनेचा आवाज ऐकताच तात्काळ घाव घेतली आणि पोलिसांनीच कळवले. शाहूवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. कृष्णा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. राधिकावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं. कृष्णा पश्चात पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

 

किरकोळ वाद आणि माजी नगरसेविकेच्या समर्थकांकडून तरुणावर तलवारीने हल्ला

 

अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. माजी नगरसेविकेच्या मुलीचा किरकोळ वाद तरुणांशी झाला. त्यामुळे माजी नगरसेविकेच्या सामर्थकांनी या तरुणावर तलवारीने हल्ला केला. तरुणावर वार करणाऱ्या नगरसेविकेच्या समर्थकांना देखील जमावाने चोप दिला. त्यानंतर माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -