Wednesday, June 25, 2025
Homeकोल्हापूरमुलीनं पळून जाऊन केलं लग्न, नंतर साक्षीदारासोबत भयंकर घडलं; कुटुंबाने पकडून…..

मुलीनं पळून जाऊन केलं लग्न, नंतर साक्षीदारासोबत भयंकर घडलं; कुटुंबाने पकडून…..

प्रेमाला जात-धर्माचं बंधन नसतं. दोन्ही प्रेमी युगुल सहमत असतील तर त्यांना लग्न करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यांना कायद्यानुसार योग्य साक्षीदार असल्यास नोंदणी विवाह करता येतो. कोल्हापुरात मात्र सध्या एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे रजिस्टर विवाहाला साक्षीदार म्हणून सही केलेल्या एका व्यक्तीला बेदम मारहाण झाली आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी या व्यक्तीच्या घरी जाऊन मारहाण केलीय. हा प्रकार समोर आल्यानंतर काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील तरुण आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील तरुणीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केला आहे. रजिस्टर कार्यालयात नोंदणी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. या विवाहासाठी त्यांच्याच ओळखीची एक व्यक्ती साक्षीदार म्हणून उपस्थित होती. मात्र आता याच साक्षीदाराला बुधवारी (18 जून) दुपारी मारहाण झाली. शुक्रवार पेठ येथील पोलीस चौकीजवळ हा प्रकार घडला. या मारहाणीवेळी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर येथे काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

 

दिवसांपूर्वी केलं होतं रजिस्टर लग्न

लक्ष्मीपुरी येथील पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली आहे. जयसिंगपूर येथील तरुण आणि आटपाडी येथील तरुणीने 15 दिवसांपूर्वी रजिस्टर लग्न केलं होतं. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी आमची मुलगी बेपत्ता झाली आहे, अशी तक्रार केली होती. या विवाहासाठी कोल्हापुरातील एक व्यक्ती साक्षीदार होती, अशी माहिती तरुणीच्या कुटुंबाला मिळाली होती. ही माहिती मिळताच तरुणीचा भाऊ काही लोकांना सोबत घेऊन साक्षीदाराच्या घरी पोहोचला आणि त्या साक्षीदाराला मारहाण केली.

 

पोलिसांनी पकडले नंतर सोडून दिले

या मारहाणीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या मारहाणीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि साक्षीदाराला ताब्यात घेतलं. तरुण आणि तरुणीने सहमतीने लग्न केलंय, हे समोर येताच पोलिसांनी त्या साक्षीदाराला सोडून दिले. दरम्यान, आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -