Thursday, July 24, 2025
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप, मदत करणाऱ्या मित्राला दिली सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप, मदत करणाऱ्या मित्राला दिली सक्तमजुरीची शिक्षा

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आणि अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अतिरिक्त सत्रन्यायाधीश सूरज केंद्रे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व 17 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

तसेच मुलीला पळवून नेण्यात मदत करणाऱ्या मित्रास तीन वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

रोहित ऊर्फ रोहन मारुती बनसोडे (वय – 24, रा. बापूजीनगर, सोलापूर) असे मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर सुमित शशिकांत काटकर (वय – 19, रा. राजस्वनगर, विजापूररोड, सोलापूर) असे कारावासाची शिक्षा सुनावलेल्या मित्राचे नाव आहे.

 

पीडित अल्पवयीन मुलगी 2020 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. महाविद्यालयीन शिक्षण घेताना ही विद्यार्थिनी एका ठिकाणी शिकवणीसाठी जात होती. तिच्या एका मैत्रिणीने तिला इन्स्टाग्रामवर अकाऊंट काढून दिले होते. पीडित इन्स्टाग्राम अॅप वापरू लागल्यानंतर तिची आरोपी रोहित बनसोडे याच्याशी ओळख झाली. आरोपीने पीडितेशी इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पीडित आणि आरोपी रोहितने पीडितेला त्याच्या आईला भेटायला जाऊ, असे सांगून त्याच्या दुचाकीवरून हैदराबाद रोडवरील एका लॉजवर नेले. तिथे पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर रोहितने पीडितेला तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

 

15 साक्षीदारांची तपासणी

 

खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 15 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये आरोपीने पीडितेवर फक्त शारीरिक अत्याचार केले नाही, तर अनेकवेळा मारहाण करून तिला भावनिक ब्लॅकमेल केल्याचे सरकारी पक्षाच्या वकिलांनी सिद्ध केले. साक्षीदारांच्या साक्षी, पीडितेची साक्ष, पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपी रोहित बनसोडेला मरेपर्यंत जन्मठेप आणि त्याचा मित्र सुमित काटकर याला 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

 

मारहाण करत पीडितेला पळवून नेले

 

आरोपी रोहितने पीडितेला वारंवार वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन तिचा छळ केला. आरोपी रोहितने पीडितेकडून पैसे, सोन्याचे दागिने घेतले. 16 मे 2021 रोजी आरोपीने आपला मित्र सुमित काटकर याच्या मदतीने पीडितेला दुचाकीवरून पळवून नेले होत. तसेच पीडितेने दुचाकीवर बसण्यासाठी नकार दिल्याने तिला दोघांनी मारहाणही केली होती.

 

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 

पीडितेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक वाय. एस. गायकवाड यांनी तपास करून पीडित विद्यार्थिनीचा शोधून घेत रोहित बनसोडे, सुमित काटकर या दोघांना अटक केली होती. तपासात पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोक्सो, बलात्काराचे कलम वाढवण्यात आले. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -