Wednesday, June 25, 2025
Homeकोल्हापूरस्मशानात स्त्री पुरूषाकडून नग्न अघोरी प्रकरणाला नवे वळण, जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला अहवाल

स्मशानात स्त्री पुरूषाकडून नग्न अघोरी प्रकरणाला नवे वळण, जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला अहवाल

स्मशानात स्त्री पुरूषाकडून नग्न अघोरी प्रकरणाला नवे वळण, जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला अहवाल

 

उदगाव (ता. शिरोळ) येथील वैकुंठधाम स्मशानभूमीतील अघोरी कृत्याची थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी समाज कल्याण विभागामार्फत जयसिंगपूर पोलिसांना दिले आहेत.

 

मात्र, याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने पोलिसांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.

 

जयसिंगपूर, उदगावसह चिपरी, धरणगुत्ती, आगर गावच्या काही भागासह सांगली जिल्ह्यातील अंकलीमधील मृतांवर या ठिकाणी अंत्यसंस्कार होत असतात. स्मशानभूमीतील अघोरी कृत्यांबद्दल कोणीही बोलायलाही तयार नाही. त्यामुळे पोलिसांना उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून प्राथमिक टप्प्यात तपास करावा लागणार आहे. स्मशानभूमीतील अघोरी कृत्यांबद्दल समाजमाध्यमांमधून आवाज उठवल्यानंतर याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश जयसिंगपूर पोलिसांना देण्यात आले आहेत.

 

या प्रकरणी अद्याप कुणीही फिर्याद दिली नाही. त्यामुळे प्रसंगी पोलिसांनाच फिर्यादी व्हावे लागणार आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी प्राथमिक टप्प्यात माहिती घेण्याचे काम सुरू आहे. उदगावमधील लोकप्रतिनिधींकडून तपासकामी सहकार्य मिळत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.

 

‘जिल्हाधिकाऱ्यांनी समाजकल्याण विभागामार्फत घटनेचा अहवाल मागितला आहे. सीसीटीव्ही फुटेजसह परिसरातील ग्रामस्थांकडून माहिती घेतली जात आहे. अघोरी कृत्य करणाऱ्यांबाबत माहिती असणाऱ्यांनी जयसिंगपूर पोलिसांशी संपर्क साधावा.

 

-सत्यवान हाके, पोलिस निरीक्षक, जयसिंगपूर पोलिस ठाणे

 

पाहणारे अनेक, सांगणारे कोण?

 

उदगाव स्मशानभूमी कोल्हापूर-सांगली महामार्गालगत आहे. नदीवरील पुलावरून उदगावच्या बाजूने उतरताना स्मशानभूमीतील हालचाली अगदी सहजपणे दिसतात. शिवाय महिला आणि पुरुषांकडून नग्न अवस्थेत झालेला अघोरी प्रकार भरदिवसा घडला आहे. त्यामुळे ही घटना अनेकांनी पाहिली आहे. पण, माहिती देण्यासाठी मात्र कोणी पुढे येताना दिसत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -