Saturday, July 26, 2025
Homeकोल्हापूरराधानगरी, वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू; नदीच्या पाणी पातळीत वाढ, १९...

राधानगरी, वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू; नदीच्या पाणी पातळीत वाढ, १९ बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असून धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.

 

पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात सरासरी एक फुटाची वाढ झाली आहे. राधानगरी, वारणा व दूधगंगा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा, वारणा, दूधगंगा नद्यांचे पाणी झपाट्याने वाढत आहे.

 

पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, चंदगड, आजरा तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सद्या १९ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.

 

पर्यटनस्थळे गजबजली

 

दरम्यानच, पावसाळी पर्यटनस्थळे गजबजून गेली आहेत. धबधबे प्रवाहित झाल्याने सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी होत आहे. अशातच घाट मार्गात दरडी कोसळल्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. करुळ, आंबा घाटात दरडी कोसळल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. हुल्लडबाजावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पथके तैनात केली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -