Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रफक्त सहा दिवस उरले; जून महिन्याचे १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी...

फक्त सहा दिवस उरले; जून महिन्याचे १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी जून महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची वाट पाहत आहे. साधारणपणे दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही रक्कम लाखो लाडकी बहिणींच्या खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते.

 

आतापर्यंत ११ हप्त्यांच्या स्वरूपात लाभार्थी महिलांना एकूण १६,५०० रुपये मिळाले आहे.महाराष्ट्राच्या महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये सुरू केलेली ही योजना राज्यातील गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम एकत्रित देण्यात आली, तर मे महिन्याचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आला. अशा परिस्थितीत, आता प्रत्येक लाभार्थी महिला जून महिन्याच्या रकमेची वाट पाहत आहे, परंतु महिला आणि बाल विकास विभागाने सध्या कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

 

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणा योजनेद्वारे प्रत्येक पात्र महिलेला दरवर्षी १८,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत कोट्यवधी महिलांना याचा फायदा झाला आहे, परंतु जून महिना संपण्यास फक्त सहा दिवस शिल्लक आहे, परंतु बाराव्या हप्त्याबाबत स्पष्टता नसल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -