Wednesday, June 25, 2025
Homeमहाराष्ट्रबिग बॉस 19 ची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार प्रीमियर, स्पर्धकांची लिस्टही...

बिग बॉस 19 ची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार प्रीमियर, स्पर्धकांची लिस्टही समोर!

देशातील सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोंपैकी एक असलेल्या ‘बिग बॉस 19’ बद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय.(shows )सलमान खानच्या दमदार सूत्रसंचालनामुळे शोची रंगत अधिक वाढते. आतापर्यंत या शोचे 18 हंगाम पार पडले असून यावेळी 19व्या सीझनची जोरदार तयारी सुरू आहे.यंदा ‘बिग बॉस OTT’ चा चौथा सीझन येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चाहत्यांचे लक्ष सरळ ‘बिग बॉस 19’ कडे वळले आहे. सुरुवातीला 19 जुलै ही संभाव्य तारीख मानली जात होती. मात्र, आता शोचा प्रीमियर 3 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची चर्चा आहे. यावर अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हीच तारीख निश्‍चित मानली जात आहे.

 

यंदाच्या सीझनमध्ये सलमान खानची एक सीक्रेट रूम असणार असून, तिथे काही नॉमिनेटेड स्पर्धकांना ठेवले जाणार आहे. ही रचना प्रेक्षकांसाठी एक नवा ट्विस्ट ठरणार आहे. या खोलीतून स्पर्धक घरातल्या इतर सदस्यांचे वर्तन पाहू शकतील. यामुळे घरात नाट्यपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे.(shows )तसेच यावेळी एव्हिक्शन फक्त टास्कमधून न होता प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावर आधारित होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. घरातील सदस्यांना रेशनही टास्क जिंकूनच मिळेल, असा नवा नियम लागू केला जाण्याची शक्यता आहे. ‘बिग बॉस 19’ मध्ये यंदा कोण-कोण सहभागी होणार यावर प्रेक्षकांचा विशेष लक्ष आहे. आतापर्यंत लीक झालेल्या माहितीप्रमाणे डेझी शाह, तनुश्री दत्ता, फैजल शेख उर्फ फैजू, खुशी दुबे, विक्रम सिंह चौहान, राम कपूर, शशांक व्यास आणि लक्ष्य चौधरी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या नावांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

 

ही नावे खरी ठरली, तर यंदाचा सीझन खूपच ग्लॅमरस आणि स्पर्धात्मक ठरणार आहे. निर्मात्यांनी यंदा यूट्यूबर्स आणि इन्फ्लुएंसर्सना सहभागी न करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.(shows )टेलिव्हिजन माध्यमांवर प्रचंड टीआरपी मिळवणाऱ्या या शोचा हंगाम जुन्याच थीमवर आधारित असणार असला तरी अनेक नव्या ट्विस्टसह तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.प्रॉडक्शनसंबंधी अडचणींमुळे OTT सीझन रद्द झाल्यामुळे निर्माते आता सर्व लक्ष टीव्ही शोकडे केंद्रीत करत आहेत.प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार असून, प्रीमियरची अधिकृत घोषणा आणि प्रोमो लवकरच रिलीज होण्याची शक्यता आहे. सलमान खान पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार, हे निश्चित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -