Wednesday, July 23, 2025
Homeइचलकरंजीपंचगंगा पातळीत वाढच पाणी पातळी ५८ फुटावर

पंचगंगा पातळीत वाढच पाणी पातळी ५८ फुटावर

संततधार पाऊस आणि धरणातून वाढलेल्या पाण्याचा विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. येथील पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून पाणी पातळी ५८ फुटावर पोहचल्याने लहान पुलाला लागुन पाणी वाहत आहे.

दोन दिवस पावसाच्या थांबून थांबून सरी सुरु होत्या मात्र, पुन्हा पावसाने जोर धरला आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र सुरु असलेला पाऊस आणिधरणातील पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. सायंकाळी पाणी पातळी ५८ फुटावर पोहचली आहे. नदीकाठावरील महादेव मंदिर, श्रीमंत घोरपडे समाधी आणि स्मशानभूमीच्या पार्किंगपर्यंत पाणी पोहचले आहे. लहान पुलाला लागुन पाणी वाहत असल्याने महापालिका प्रशासनाने बँरैकेटस लावून हा पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -