गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
यामुळे कृष्णा नदीवरील औरवाड पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, शिरढोण-कुरुंदवाड मार्गावरील पुलाच्या स्लॅबवरही पाणी चढले आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत हा पूलही पूर्णपणे जलमय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या नदीचा प्रवाह मंद असला तरी पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.