Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगपालखी मार्गावरील खुली मांस विक्री दुकाने बंद करण्याची भाविकांची मागणी

पालखी मार्गावरील खुली मांस विक्री दुकाने बंद करण्याची भाविकांची मागणी

सध्या आषाढी एकादशीला पंढरपूर कडे जाणाऱ्या शेकडो पालख्या पालखी मार्गावरून मार्गक्रमण करत आहेत. अशाच पालख्या अंबाजोगाई शहरातील मुख्य पालखी मार्गावरून जात आहेत. या मार्गावर अंबाजोगाई शहरातील पंचायत समितीत कार्यालयासमोर अतिक्रमणे करुण मांस विक्रीची दुकाने थाटली आहेत.

 

या दुकानासमोरून जातांना वारकर्‍यांना आपल्या इष्टगुरूंच्या पालख्या घेऊन जातांना संकोच होतो. शहरातील पालखी मार्गावरील असलेली खुल्या मांस विक्रीची दुकाने तात्काळ बंद करण्याची मागणी भाविकांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

विषेश म्‍हणजे मांस विक्रेत्यांची दुकानांचे अतिक्रमण हटवण्याऐवजी याच मार्गावर वर्तमानपत्र विकून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्‍यांवरच पोलिसांकडून दमदाटी होत आहे. याविषयी शहरात चर्चा सुरु आहे. भर रस्त्यावर उघड्यावर असलेल्या चिकन मटणाच्या दुकानाकडे पोलिस प्रशासन हे कशामुळे डोळेझाक करत आहे असा संतप्त सवाल देखिल वारकरी तथा भाविकांतुन उपस्थित केला जात आहे.

 

पंचायत समिती कार्यालयासमोर राजकमल हॉटेल ते पं.स.कार्यालय गेट पर्यंत अनेक चिकन मटणाची दुकाने थाटली आहेत. सध्या आषाढ महिना सूरू आहे. याच रस्त्यावरून वारकरी संप्रदायांची दिंडी, पालखी मार्गक्रमण होते. मात्र येथे उघड्यावर मांस विक्री होत आहे याचे कसलेच सोयरसुतक येथील राजकीय पुढारी व पोलिस प्रशासनाला दिसून येत नाही. येणाऱ्या पालख्यांचा सोबत पोलीस देखील चालतांना आढळून येतात मात्र ते त्याच मार्गावर असणाऱ्या खुल्या मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांना कोणतीही समज दिली जात नाही. हे पाहून पोलिसांकडून उलट त्यांना अभय दिले जात असल्याची छुपी चर्चा सध्या शहरवासीयांत होताना दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -