Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्र‘ही’ महत्वाची बँक अडचणीत, सीईओंनी दिला राजीनामा; खातेदारांवर काय परिणाम होणार?

‘ही’ महत्वाची बँक अडचणीत, सीईओंनी दिला राजीनामा; खातेदारांवर काय परिणाम होणार?

खाजगी क्षेत्रातील महत्वाची बँक असलेल्या कर्नाटक बँकेला मोठा धक्का बसला आहे. कंपनीतील अंतर्गत कलहामुळे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीकृष्णन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी शुक्रवारी राजीनामा सादर केला आहे. त्यानंतर आता बँकेचे कार्यकारी संचालक शेखर राव हे देखील 30 जुलैपर्यंत राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात बँकेच्या नेतृत्वात मोठे होण्याची शक्यता आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने केलेल्या काही खर्चावरून संचालक मंडळ आणि सीईओ यांच्यात मतभेद निर्माण झाले. बँकेच्या ऑडिटर्सने मे महिन्यात साद केलेल्या अहवालात 1.53 कोटी रुपयांच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सीईओ श्रीकृष्णन शर्मा आणि कार्यकारी संचालक शेखर राव यांच्यावर बँकेच्या संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय 1.53 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शर्मा यांनी पद सोडल्याचे बोलले जात आहे.

 

सीईओंचा फक्त 2 वर्षांचा कार्यकाळ

 

श्रीकृष्णन शर्मा हे केवळ 2 वर्षांसाठी सीईओ पदावर होते. शर्मा यांनी 9 जून 2023 रोजी बँकेचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला होता, ते तीन वर्षांसाठी या पदावर राहणार होते, मात्र त्यांनी त्याआधीच पद सोडले आहे. शेखर राव यांनी 1 फेब्रुवारी 2023 पासून पदभार स्वीकारला होता, मात्र आता तेही पद सोडण्याच्या तयारीत आहेत. अद्याप बँकेने कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मात्र शर्मा यांच्या राजीनाम्याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

 

बँकेला नवीन सीईओ मिळणार

 

कर्नाटक बँकेला आगामी काळात नवीन सीईओ शोधावा लागणार आहे. तसेच शेखर राव हेही पद सोडण्याच्या तयारीत असल्याने बँकेच्या व्यवस्थापनात मोठा बदल होऊ शकतो.

 

22 राज्यांमध्ये शाखा

 

कर्नाटक बँकेची स्थापना 18 फेब्रुवारी 1924 रोजी झाली होती. या बँकेचे मुख्यालय मंगलोर येथे आहे. या बँकेच्या शाका संपूर्ण भारतात आहेत. या बँकेच्या 22 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 957 शाखा आहेत. तसेच बँकेचे 1188 एटीएम आहेत. तसेच ही बँक शेअर बाजारातही लिस्टेड आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -