Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्र'माझ्यासोबत एक रात्र घालव, तुला 40,000 देईन.', सासऱ्यानेच दिली सुनेला ऑफर, पतीला...

‘माझ्यासोबत एक रात्र घालव, तुला 40,000 देईन.’, सासऱ्यानेच दिली सुनेला ऑफर, पतीला सांगताच जे उत्तर मिळाला पोलिसही हादरले

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे सासऱ्याने सुनेच्या समोर इतकी घाणेरडी ऑफर ठेवली की ती थक्क झाली. वैतागून तिने सासऱ्याची तक्रार आपल्या पतीकडे केली. पण पतीने उलट तिला सासऱ्याचे म्हणणे मान्य करण्यास सांगितले.

 

शिवाय, पत्नीवर मारहाणही केली. आता महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

हे प्रकरण कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणीचे 2019 मध्ये नेहरू एन्क्लेव्ह, शमशाबाद रोड येथे राहणाऱ्या एका तरुणाशी लग्न झाले. लग्नानंतर सासऱ्याने सुनेवर वाईट नजर ठेवण्यास सुरुवात केली आणि अनेकदा तिच्याशी अश्लील बोलणे सुरु केले. याची माहिती महिलेने आपल्या पतीला दिली. यावेळी पतीनेही आपल्या वडिलांचा पाठिंबा देत सांगितले, “ते जे सांगत आहेत तसे कर.” जेव्हा महिलेने पतीचे म्हणणे मानले नाही, तेव्हा पतीने तिला मारहाण केली.

 

“मलाही तू बाबांचे म्हणणे मानावेस असे वाटते”

 

येथे गोष्ट संपली नाही. सासऱ्याच्या उद्दाम वर्तनाला कंटाळून महिलेने पुन्हा पतीकडे तक्रार केली, तेव्हा पती म्हणाला, “मलाही तू बाबांचे म्हणणे मानावेस असे वाटते.” हे ऐकून महिला संतापली आणि ती आपल्या माहेरी निघून गेली. माहेरी गेल्याच्या दोन दिवसांनंतर सासरा तिच्या माहेरी पोहोचला आणि तिला एकटीला गाठून तिच्या अंगाला हात लावत शारीरिक संबंधाची मागणी करु लागला. याबदल्यात 40,000 रुपये देण्याचे सांगितले. यावेळी महिलेने सासऱ्याच्या उद्दाम कृत्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. तसेच, पैसे देऊन शारीरिक संबंधाची मागणी करणारी व्हॉट्सअॅप चॅटही तिच्याकडे आहे, ज्यामध्ये सासऱ्याने आपली चूक मान्य केली आहे.

 

अश्लील कृत्यांचा व्हिडीओ आणि चॅट

 

एवढेच नाही, तर महिलेने सासऱ्यावर शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला आहे. तसेच, सासऱ्याच्या अश्लील कृत्यांचा व्हिडीओ आणि चॅट पोलिसांना दाखवले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. तपासाच्या आधारे कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -