जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात झाली आहे. तब्बल 58.50 रुपयांनी गॅस स्वस्त झाला आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडर नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. म्हणजेच हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. नव्या दरानुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत १,६६५ रुपयांवर आली आहे. यापूर्वी जूनच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात केली होती, ज्यामुळे त्याची किंमत १,७२३.५० रुपयांवर आली होती.आता हे दर आणखी कमी झाले आहेत.
कोणत्या शहरात किती दर? LPG Cylinder Price
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्यांकडून गॅस सिलेंडरचे नवीन दर (LPG Cylinder Price) जाहीर केले जात असतात. आजही तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. आज मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1616 इतकी झाली आहे. चेन्नईत 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1823.50 रुपये एवढी झाली आहे. तर राजधानी दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1665 रुपयांना मिळणार आहे.
घरगुती सिलेंडरचे काय?
दुसरीकडे, सध्या घरगुती सिलेंडरच्या बाबतीत (LPG Cylinder Price) कोणताही दिलासा नाही, कारण घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आहे तशीच कायम आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. एप्रिल महिन्यात या सिलेंडरच्या किमती ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या, ज्या ८ एप्रिल २०२५ पासून लागू झाल्या. तेव्हापासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 852.50 रुपये आहे. दरम्यान, भारतातील एकूण एलपीजीपैकी सुमारे ९० टक्के LPG घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जातो. उर्वरित १० टक्के व्यावसायिक, औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रात वापरला जातो. व्यावसायिक दरांमध्ये चढ-उतार होत असतानाही देशांतर्गत सिलिंडरच्या किमती अनेकदा स्थिर राहतात.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती
मुंबई – 852.50
पुणे – 856
दिल्ली – 853
वाराणसी – 916.50
लखनौ – 890.50
हैदराबाद – 905
बेंगळुरू – 855.50
पटना – 942.50
आग्रा – 865.50
मेरठ – 860
गाझियाबाद – 850.50
इंदूर – 881
भोपाळ – 885.50
लुधियाना – 880