झगमगत्या विश्वातील एक अशी अभिनेत्री जिने वयाच्या 16 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि 18 व्या वर्षी टॉप अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. तिने अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री आरती अग्रवाल आहे. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण तिचा अंत अत्यंत वाईट होता.
आरती पेनसिल्व्हेनियामध्ये असताना, अभिनेता सुनील शेट्टीने एकदा तिला एका कार्यक्रमात डान्स करताना पाहिलं, त्यानंतर त्याने आरची हिच्या कुटुंबाशी बोलून तिला चित्रपटांमध्ये येण्यास सांगितले आणि तिथून तिचा प्रवास सुरू झाला. आरतीने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
2001 मध्ये ‘पागलपन’ नावाच्या हिंदी सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला पण आरतीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर आरती ‘Nuvvu Naaku Nachav’ या तेलुगू सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. आरतीने स्वतःच्या कारकिर्दीत व्यंकटेश, महेश बाबू, प्रभास, नागार्जुन आणि रवी तेजा सारख्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलं.
आरतीने हिंदी, तेलुगू आणि तमिळ सिनेमांसह सुमारे 25 सिनेमांमध्ये काम केलं. प्रोफेशनल आयुष्यात आरती यशाच्या शिखरावर होती. पण आरतीने वयाच्या 21 व्या वर्षी आत्महत्येचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला.
रिपोर्टनुसार, आरती हिने पिहल्यांदा फिनाईल पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी, तिला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अभिनेत्री घराच्या छचावरून उडी मारली होती. यामागचं कारण देखील समोर आलं होतं. बॉयफ्रेंड तरुण याच्यासोबत ब्रेकअप झाल्यामुळे अभिनेत्रीने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर वयाच्या 23 व्या वर्षी तिने लग्न केलं. पण अभिनेत्रीचं लग्न फार काळ टिकलं नाही. ज्यामुळे अभिनेत्री फार त्रासलेली होती. 2 वर्षात अभिनेत्रीचं लग्न मोडलं. आरतीच्या आयुष्यातीस समस्या येथेच संपल्या नाहीत, तिचं वजन हळूहळू वाढू लागलं होतं. ज्यामुळे अभिनेत्रीला काम मिळणं देखील बंद झालं होतं.
सिनेमांपासून दूर असलेल्या आरतीने वजन कमी करण्यासाठी लिपोसक्शन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांनी तिला समजावून सांगितलं होतं की, सर्जरी धोकादायक असू शकते, परंतु आरती इतकी त्रासलेली होती की तिने कोणाचं ऐकलं नाही.
लिपोसक्शन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय अभिनेत्रीच्या जीवावर बेतला. सर्जरीनंतर आरती हिला श्वास घेण्यात त्रास होऊ लागला ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरु होण्यापूर्वीच अभिनेत्रीची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर अभिनेत्रीला हृदय विकाराचा झटका आला आणि तिचं निधन झालं. रिपोर्टनुसार, आरती लठ्ठपणा तसेच फुफ्फुसांच्या आजाराने ग्रस्त होती. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला.