Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रसंतापजनक! 40 वर्षीय शिक्षिकेचा 11 वीच्या विद्यार्थ्यावर बलात्कार, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन...

संतापजनक! 40 वर्षीय शिक्षिकेचा 11 वीच्या विद्यार्थ्यावर बलात्कार, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन ठेवायची संबंध

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देशातील अव्वल पाच शाळांपैकी एक असलेल्या मुंबईतील एका नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेला (Woman Teacher) अल्पवयीन विद्यार्थ्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

 

दादर पोलिसांनी (Dadar Police) या शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हाही नोंदवला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लैंगिक अत्याचार गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरू होता. या काळात, आरोपी शिक्षिकेने (वय 40) विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये (Five Star Hotels) नेऊन त्याचे लैंगिक शोषण केले. विद्यार्थ्याने गप्प राहावे, यासाठी ती त्याला नैराश्यविरोधी औषधंही देत होती. विद्यार्थी अकरावीमध्ये शिक्षण घेत होता.

 

विद्यार्थ्यानं कुटुंबियांना सांगितला भयानक अनुभव

 

परीक्षा संपल्यानंतर, आरोपी शिक्षिकेने आपल्या नोकराला विद्यार्थ्याला भेटण्यासाठी पाठवले. यावेळी विद्यार्थ्याने आपल्या पालकांना या भयंकर अनुभवाची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिक्षिकेला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

 

काय म्हणाले पोलिस?

 

शिक्षिका संबंधित विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये, तसेच विमानतळाजवळील लॉजमध्ये घेऊन जाऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होती. हे संबंध प्रस्थापित करण्याआधी ती अनेकदा त्याला मद्य पाजत असे, असे पोलिसांनी सांगितले.

 

प्रसिद्ध शाळेची प्रतिमा मलीन; शिक्षिका कोठडीत

 

या शिक्षिकेच्या अटकेनंतर, देशातील एक प्रतिष्ठित शाळा आणि तिचे काही प्रसिद्ध माजी विद्यार्थी यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. सध्या ही शिक्षिका पोलिस कोठडीत असून तपास अधिकाधिक खोलात सुरू आहे.

 

विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल; पालकांच्या लक्षात आली खरी कहाणी

 

हे शोषण सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी, विद्यार्थ्याच्या वागण्यात बदल दिसून येऊ लागला. पालकांनी त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने घडलेल्या सर्व अत्याचारांची माहिती दिली. मात्र, विद्यार्थ्याचे शालेय शिक्षण पूर्ण होण्यासाठी काही महिनेच उरले असल्यामुळे कुटुंबीयांनी त्या वेळी गुप्तता बाळगण्याचा निर्णय घेतला. त्यांना आशा होती की, शिक्षिका त्याला सोडून देईल.

 

शिकवणाऱ्यांकडूनच विश्वासघात

 

या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहेत. शाळा आणि पालक दोघांनाही धक्का बसला आहे की, शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांकडूनच अशा प्रकारचा विश्वासघात होऊ शकतो. पोलिसांनी शिक्षिकेच्या मोबाइलमधील चॅट्स, हॉटेल बुकिंग्ज आणि इतर डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी अधिक तपशीलवार चौकशी सुरू असून शिक्षिकेवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -