Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रसीक्रेट रुम, नॉमिनेशन पॉवर.. ‘बिग बॉस 19’मध्ये जबरदस्त सरप्राइज; काय असेल सलमानच्या...

सीक्रेट रुम, नॉमिनेशन पॉवर.. ‘बिग बॉस 19’मध्ये जबरदस्त सरप्राइज; काय असेल सलमानच्या शोची थीम?

‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. सलमान खानच्या या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आता लवकरच ‘बिग बॉस’चा 19 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिझन ऑगस्ट महिन्यात ऑन एअर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 

‘बिग बॉस तक’ या सोशल मीडियावरील पेजने याबद्दलची सगळी अपडेट दिली आहे. या पेजनुसार, ‘बिग बॉस 19’ हा नवीन सिझन जवळपास साडेतीन महिने चालेल. निर्मात्यांनी ठरवलंय की यंदा टीव्ही व्हर्जनपासून शोची सुरुवात केली जाईल. त्यानंतर ओटीटी व्हर्जन स्ट्रीम होणार.

 

या नवीन सिझनची थीम काय असेल, यात कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील, टास्क कसे असतील, याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या सिझनची थीम Rewind असेल. त्याचप्रमाणे बऱ्याच वर्षांनंतर निर्माते या शोमध्ये सिक्रेट रुमला परत आणतील.

 

इतकंच नव्हे तर सिझनमधील स्पर्धकांना नॉमिनेट करण्याची पॉवर प्रेक्षकांकडे असेल. त्यानंतर एविक्शनमध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची महत्त्वाची भूमिका असेल.

 

बिग बॉसच्या मागच्या सिझनला प्रेक्षकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे यंदाचा सिझन पूर्णपणे वेगळा असेल, याची काळजी निर्मात्यांकडून घेतली जात आहे. ‘बिग बॉस 18’चा विजेता प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता करणवीर मेहरा ठरला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -