Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रशिक्षकाने रागावलं, 10 वीच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं; मुलांच्या मानिसकेतवर अनेक...

शिक्षकाने रागावलं, 10 वीच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं; मुलांच्या मानिसकेतवर अनेक प्रश्न

काही दिवसांपूर्वी एका मुख्याध्यापक पित्याने आपल्या मुलीला कमी गुण मिळाल्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यामध्ये, मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. आता, एका शिक्षकाने भरवर्गात (School) अभ्यासावरील काही प्रश्न विचारले व त्याची उत्तरे न आल्याने विद्यार्थीनीला अपमानित करून विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांवरून अपशब्द उच्चारल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या अपमानाचा मनात राग ठेऊन इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची मन सुन्न करणारी घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात घडली. सर्वत्र हळहळ करणारी ही घटना वाटत असली तरी, या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील ही घटना आहे. जय हनुमान विद्यालयाची इमारत, काल सकाळी साडेअकरा वाजता याच शाळेत विनायक उर्फ विवेक महादेव राऊत हा दहावीत शिकणारा विद्यार्थी शाळेत आला होता. नेहमीप्रमाणे पहिला तास सुरू झाला, वर्गात वर्गशिक्षक असलेले गोपाल सूर्यवंशी हे शिक्षक शिकवण्यासाठी आले. त्यांनी इतर मुलांसह विनायकलाही काही प्रश्न विचारले. मात्र, विनायकला प्रश्नांची उत्तरे न आल्याने शिक्षकांनी त्याला रागावून तुझ्या आई-वडिलांकडे तुझी तक्रार करावी लागेल, तुला अभ्यासात काही येत नाही असे म्हटले. तसेच, आई-वडिलांवरून काही अपशब्द बोलल्याची माहिती आहे. त्यावरून विनायकला राग आला व त्याने मधल्या सुट्टीनंतर गावाजवळील त्याच्या शेतातील घरात सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर, तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. विनायकने गळफास घेतल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पोहोचली, गावातील नागरिक शाळेत पोहोचले व त्यांनी शिक्षक गोपाल सूर्यवंशी याला जबाबदार धरत चांगला चोप दिला. शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केलं, विनायकच्या काकांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षक गोपाल सूर्यवंशी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंद केला आहे.

 

शिक्षकांविरुद्ध गुन्हा, आरोपीला अटक

याबाब तक्रारदार मुलाचे काका गोपाल राऊत म्हणाले की, आमचा पाल्य विनायक यास शिक्षकाने त्याच्या आई-वडिलांवरून अपशब्द बोलल्यामुळे त्याला अपमान सहन झाला नाही, व त्याने आत्महत्या केली. तर शिक्षक गोपाल सूर्यवंशी यांनी मी फक्त त्याला प्रश्न विचारले असता त्याला उत्तर न आल्यामुळे तुझ्या आई-वडिलांना बोलावून मी तुझी तक्रार करेल इतकच बोललो असं म्हटलं. या संपूर्ण घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून बुलढाणा जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत कसं वागावे किंवा 12 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांसोबत किंवा मुलांसोबत कशी वागणूक असावी, याबाबत बाल मानसोपचार तज्ञांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

 

13 ते 18 वर्षे वयाच्या मुलांशी प्रेमाने वागा

वयाचा 13 ते 18 वर्षे हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. या टप्प्यातील मुलांना adolcent असे म्हटले जाते, या टप्प्यात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. शरीरात टेस्टेस्टेरॉन आणि एड्रीनलीन असे अंतरस्त्राव अर्थात हार्मोस मोठ्या प्रमाणात तयार होत असतात. त्यामुळे या वयातील मुलांच्या मानसिकतेवर वागणुकीवर मोठे बदल होत असतात. मुलं चिडखोर होत असतात, या वयातील मुलांना थोडेही रागावले तर त्यांना मोठा राग येतो. त्यामुळे या टप्प्यातील वयाच्या मुलांसोबत वागताना मधुर संवाद, प्रेमाची वागणूक व जास्तीत जास्त संवाद असणे आवश्यक असते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. योगेश सपकाळ यांनी म्हटले. वयाचा हा टप्पा खूप संवेदनशील असल्यामुळे या टप्प्यातील व मुलांसोबत अतिशय संवेदनशीलपणे वागावं लागत. थोडंही रागावलं तरी या वयातील मुलं टोकाच पाऊल घेण्याची शक्यता असते. काही मुलं अतिशय आक्रमक असतात, तर काही मुलं अतिशय शांत असतात, त्यामुळे आपल्या मुलांमध्ये असे बदल जाणवल्यास त्यांनी तात्काळ आपल्या मुलांना मानसोपचार तज्ज्ञाला दाखवणे गरजेचे असते, असेही सपकाळ यांनी सांगितले.

 

दरम्यान,या संपूर्ण घटनेवर पोलीस मात्र काहीही बोलायला तयार नाहीत. आरोपी शिक्षकांवर गुन्हा दाखल करून शिक्षक ताब्यात असल्याची माहिती तपास अधिकारी मुकेश गुर्जर यांनी दिली आहे. तर, सध्या आरोपीची चौकशी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -