Friday, July 4, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : मला जगायचं नाही सोडा, महिला जीवनाला कंटाळून इचलकरंजी घाटावर गेली...

इचलकरंजी : मला जगायचं नाही सोडा, महिला जीवनाला कंटाळून इचलकरंजी घाटावर गेली अन्…

इचलकरंजीतील पंचगंगा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले.(woman ) घरगुती वादातून संबंधित पन्नास वर्षीय महिला पंचगंगा घाटावरुन थेट पूराच्या पाण्यात जात होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीने तिला रोखण्यात आले.या महिलेस मुलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. संभाव्य पूरस्थितीमुळे नदीकाठी महापालिकेची संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यामुळेच या महिलेला वाचविण्यास यश आले. यावेळी ती महिला मला जगायच नाही तुम्ही सोडा अशी मागणी करत होती. परंतु आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिची समजूत काढत तिला तेथून बाहेर आणल्याने मोठा अनर्थ टळला.

 

इचलकरंजी शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे.(woman ) नदीची पाणी पातळी वाढत असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.शहरात रिपरिप तर ग्रामीण भागात व धरण क्षेत्रात पावसाचा जोर राहिला. यामुळे धरणांच्या साठ्यातही वाढ झाली असून, येत्या २४ तासांत अनेक धरणांतून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

तसेच धरणांच्या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाऊस वाढल्याने नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या. पंचगंगेची पातळी सकाळी सात वाजता ३१ फूट तीन इंच होती. ती रात्री नऊ वाजता ३२ फूट दोन इंचांवर गेली. सकाळी तीन तास पातळी स्थिर राहिली. त्यानंतर त्यामध्ये तासा-तासाला एक इंचाने वाढ होत गेली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -