Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रयाला म्हणतात खरं प्रेम! जोडीदाऱ्याच्या मृत्यूनंतरही सोबत वारील नेलं; शेवटी चंद्रभागेत आजीनं...

याला म्हणतात खरं प्रेम! जोडीदाऱ्याच्या मृत्यूनंतरही सोबत वारील नेलं; शेवटी चंद्रभागेत आजीनं काय केलं पाहा, PHOTO पाहून डोळ्यांत येईल पाणी

आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा असतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात.

 

अशात ते पंढरपूरी जात असताना अभंग गातात, फुगड्या खेळतात आणि त्यासोबतच डान्स करताना दिसतात. या वारीत येणाऱ्या लोकांची वयाची काही सीमा नसते.आषाढी एकादशी नुकतीच पार पडली. गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर वारीतले अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशातच एका आजीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, यामध्ये आयुष्यभराती साथ देण्याचं वचन देणारा, प्रत्येक वारी सोबत करणारा पती वाटेत अर्ध्यात सोडून गेल्यावर या आजीनं जे केलंय ते पाहून तुम्हालाही खऱ्या प्रेमाचा अर्थ समजेल आणि नकळत डोळ्यांत पाणी येईल.

 

काही नात्यांना शब्द लागत नाहीत…काही नाती ही फक्त श्रद्धेने आणि आठवणीने जपली जातात, अशाच या आजीनं आपल्या पतीवरचं प्रेम त्याच्या सोडून जाण्यानंतरही कमी होऊ दिलं नाही आणि पांडुरंगाची वारीही चुकू दिली नाही. वारकरी १८, २० दिवस वारीत चालल्यानंतर अखेर आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करतात. अशीच एक आजी वारी झाल्यानंतर चंद्रभागेत आली आणि त्यानंतर तिनं केलं ते पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. दरवर्षी जोडीनं वारी करणाऱ्या आजीच्या पतीनं अर्ध्यातच त्यांची साथ सोडली आणि ते निघून गेले. मात्र आजी खचली नाही तिनं न चुकता याहीवर्षी वारी केली तेही आजोबांना सोबत घेऊन…आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर या आजीनं आजोबांचा फोटो सोबत घेऊन यावर्षीची वारी पूर्ण केली आणि शेवटी आजोबांच्या फोटोला चंद्रभागेत स्नानह घातलं.

 

सोशल मीडियावर हे फोटो shivajidhut नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. यावेळी कॅप्शनमध्ये, पुण्याची गणना कोण करी! आजकाल कोण लावत हो एवढं जीव? आम्ही पाप धुवायला चंद्रभागेत गर्दी केली, पण माणूस गेल्यावर सुद्धा फोटोला सोबत घेऊन वारी करून, त्याच्या नशीबी वारीचं भाग्य लावून गेली.. असं लिहलं आहे.

 

तर अनेकजण फोटो पाहून भावूक झाले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “काही नात्यांना शब्द लागत नाहीत…काही नाती ही फक्त श्रद्धेने आणि आठवणीने जपली जातात…”!” दुसरा म्हणतो, “जुन्या लोकांनी आपकी संस्कृती जपून ठेवली आहे. धन्य ती माणसं जी इथपर्यंत एकमेकांना सांभाळत आली नाही तर आजचे जगात गरजे पुरते नाते आहे.” तर आणखी एकानं, “आयुष्यभराती साथ देण्याचं वचन देणारा, प्रत्येक वारी सोबत करणारा पती वाटेत अर्ध्यात सोडून गेला म्हणून माऊली तिथंच थांबली नाही आणि वारीदेखील चुकू दिली नाही. फोटोरुपी पतीला सोबत घेऊन माऊली आज आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेत उतरली. त्या माऊलीच्या नजरेतून वाहणारी श्रद्धा, प्रेम आणि समर्पण हीच खरी वारी, हीच खरी पांडुरंगभक्ती!”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -