Saturday, January 17, 2026
Homeमहाराष्ट्रआई-वडिलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी परदेशात गेली निमिषा, 16 जुलै रोजी होणार फाशी!

आई-वडिलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी परदेशात गेली निमिषा, 16 जुलै रोजी होणार फाशी!

केरळमधील पलक्कड येथील रहिवासी आणि पेशाने नर्स असलेल्या निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी यमनमध्ये फाशी दिली जाईल. प्रियावर एका यमनच्या नागरिकाची हत्या केल्याचा आरोप आहे, अशी माहिती मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम यांनी दिली.

 

तुरुंगात आहे. जेरोम यांच्याकडे निमिषा प्रियाची आई प्रेमा कुमारी यांची ‘पॉवर ऑफ अटॉर्नी’ (मुखत्यारपत्र) आहे. जेरोम यांनी सांगितले की, तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांना फाशीची तारीख कळवली आहे. त्याचबरोबर निमिषा प्रियालाही याबद्दल अधिकृतपणे कळवण्यात आले आहे.

 

सॅम्युअल जेरोम यांनी सांगितले की, चर्चा सुरू होती, परंतु यमनच्या नागरिकाच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. ‘ब्लड मनी’ (रक्तरक्कम) वरही कोणताही तोडगा निघू शकला नाही. यमनच्या नागरिकाच्या कुटुंबाला 10 लाख डॉलरची (सुमारे 8.3 कोटी रुपये) ऑफर देण्यात आली होती. एका प्रायोजकाच्या मदतीने पैसेही गोळा केले जात आहेत. सूत्रांनुसार, अजूनही पर्याय खुले आहेत. त्याचबरोबर भारत सरकार तिचे प्राण वाचवण्यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करू शकते.

 

कोण आहे निमिषा?

 

केरळमधून आलेली निमिषा प्रिया नर्सिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये यमनला गेली होती. ती आपल्या आई-वडिलांना चांगले आयुष्य देण्यासाठी तेथे गेली होती असे सांगितले जाते, कारण तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सुरुवातीला तिने यमनमधील अनेक रुग्णालयांमध्ये दिवसरात्र काम केले. त्यानंतर तिने स्वतःचे क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. ती 2014 मध्ये तलाल अब्दो महदीच्या संपर्कात आली. तलालने निमिषाला यमनमध्ये क्लिनिक सुरू करण्यास मदत करण्याचे वचन दिले. निमिषाला वाटले की आता तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

 

काय आहे प्रकरण?

 

यमनमधील व्यापार कायद्यानुसार, जो व्यक्ती त्या देशाचा नागरिक नाही, त्याला देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करावी लागते. निमिषाने कायद्यांनुसारच क्लिनिक उघडण्यासाठी भागीदारी केली आणि अटी मान्य केल्या. निमिषाने 2015 मध्ये महदीसोबत तिचे क्लिनिक सुरू केले. पण लवकरच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. तिने महदीवर गैरवर्तन आणि छळाचा आरोप केला होता. महदीने तिचा पासपोर्टही काढून घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -