महाराष्ट्रात पावसाने कहर केला असून हवामान विभागाने कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे.(danger)येत्या २४ तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा धोका वर्तवण्यात आला आहे. यामुळे NDRF आणि SDRF टीम सज्ज ठेवण्यात आल्या असून, लष्करालाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नागपूरमध्ये पावसाने थैमान घातले असून 40 नागरिकांना आतापर्यंत सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विपीन ईटकर यांनी सांगितले की, आज ऑरेंज अलर्ट असून आणखी पावसाचा जोर वाढल्यास लष्कराची मदत घेतली जाईल. (danger)नागपूरसह अकोला, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. (danger)समुद्र खवळलेला असून, किनाऱ्यांजवळ जाणं टाळा, असा सल्ला प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.घाटमाथ्यावरील भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचू शकतात. पुराचा धोका लक्षात घेता स्थानिक प्रशासन अलर्टवर आहे.छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे हवामान खात्याचे आवाहन आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळू शकतात.






