Saturday, July 12, 2025
Homeक्रीडाएकाच सामन्यात ४३० धावा करणाऱ्या शुभमन गिलची गरुडझेप; रुटला मागे टाकत संघसहकाऱ्यानं...

एकाच सामन्यात ४३० धावा करणाऱ्या शुभमन गिलची गरुडझेप; रुटला मागे टाकत संघसहकाऱ्यानं पटकावला अव्वल क्रमांक

भारतीय क्रिकेट संघाने ६ जुलैला इंग्लंडला बर्मिंगहॅममधील ऍजबॅस्टन ३३६ धावांनी पराभूत केले. भारताचा हा परदेशातील धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा विजय होताच, याशिवाय ऍजबॅस्टनमधीलही हा भारताचा पहिला विजय होता.

 

या सामन्यात विजय मिळवून देण्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने मोलाचा वाटा उचलला. त्याला आता त्याचा मोठा फायदा झाला आहे. त्याने केलेल्या कामगिरीमुळे गरुडझेप घेतली आहे. याशिवाय अव्वल क्रमांकावरही नवा खेळाडू विराजमान झाला आहे.

 

ऍजबॅस्टन कसोटीत इंग्लंडला पराभवाचा धक्का बसला असला तरी या सामन्यात पहिल्या डावात संघ अडचणीत असताना हॅरी ब्रुकने १५८ धावांची खेळी केली होती. त्याने जॅमी स्मिथसोबत त्रिशतकी भागीदारीही केली होती. त्यामुळे त्याचा आता त्याला फायदा झाला असून तो कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला आहे.

 

ब्रुकने त्याचाच संघसहकारी जो रुटला मागे टाकत कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये पहिला क्रमांका पटकावला आहे. रुट आता १८ गुणांनी ब्रुकच्या मागे पडला आहे. रुटला दुसऱ्या कसोटीत खास काही करता आले नव्हते. ब्रुकचे ८८६ गुण आहेत, तर जो रुटने ८६८ गुण आहेत.

 

ऍजबॅस्टन कसोटीत शुभमन गिलने पहिल्या डावात २६९ आणि दुसऱ्या डावा १६१ असे मिळून ४३० धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे शुभमनने थेट १५ स्थानांची झेप घेत पहिल्या १० जणांमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता ६ व्या क्रमांकावर आला आहे. तसेच त्याने कारकि‍र्दीत सर्वोत्तम ८०७ गुण मिळवले आहेत.

 

गिलच्या पुढे सध्या ब्रुक आणि रुटशिवाय केन विलियम्सन (तिसरा क्रमांक), यशस्वी जैस्वाल (चौथा क्रमांक) आणि स्टीव्ह स्मिथ (पाचवा क्रमांक) आहेत. दरम्यान रिषभ पंत सातव्या क्रमांकावर घसरला आहे. तो तेंबा बाऊमासह या क्रमांकावर आहे.

 

दरम्यान ऍजबॅस्टन कसोटीत पहिल्या डावात नाबाद १८४ आणि दुसऱ्या डावात ८८ धावांची खेळी करणारा इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॅमी स्मिथ यानेही १६ स्थानांची झेप घेतली आहे. तो आता १० व्या क्रमांकावर आला आहे.

 

याशिवाय नुकताच झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातही दुसरा कसोटी सामना झाला, ज्यात विआन मुल्डरने त्रिशतकी खेळी करताना नाबाद ३६७ धावा चोपल्या. त्यामुळे त्याने तब्बल ३४ स्थानांची उडी घेत २२ वा क्रमांक मिळवला आहे.

 

तसेच त्याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही १२ स्थानांची झेल घेत तिसरा क्रमांक मिळवला आहे. तो आता रवींद्र जडेजा आणि मेहदी हसन मिराज यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये जडेजा अव्वल क्रमांकावर, तर मेहदी हसन मिराज दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

 

गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा जसप्रीत बुमराह कायम आहे. तसेच पहिल्या १० क्रमांकामध्ये बदल झालेला नाही. दुसऱ्या क्रमांकावर कागिसो रबाडा, तिसऱ्या क्रमांकावर पॅट कमिन्स, चौथ्या क्रमांकावर जोश हेजलवूड आणि पाचव्या क्रमांकावर नोमन अली कायम आहे.

 

दरम्यान, मोहम्मद सिराजने ऍजबॅस्टनमध्ये ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो आता ६ स्थानांची झेप घेत २२ व्या क्रमांकावर आला आहे. याशिवाय वेस्ट इंडिजचा शामर जोसेफ २९ व्या, तर अल्झारी जोसेफ ३१ व्या क्रमांकावर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -