Saturday, July 12, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: लुट प्रकरणाचा दोन दिवसांत छडा सराईताकडून दोन दुचाकी,चार गॅस सिलिंडर्स जप्त

इचलकरंजी: लुट प्रकरणाचा दोन दिवसांत छडा सराईताकडून दोन दुचाकी,चार गॅस सिलिंडर्स जप्त

लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने शिवीगाळ करत मोपेड व खिशातील १२०० रुपयांची लुट प्रकरणाचा शहापूर पोलिसांनी दोन दिवसांत छडा लावत आदित्य लक्ष्मण भस्मे (वय २५ रा. भाग्यश्री कॉलनी थोरात चौक) या सराईताला अटक केली. त्याच्याकडून चोरलेल्या मोपेडसह अन्य एक दुचाकी, १२०० रुपये व चार गॅस सिलिंडर्स असा १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जन करण्यात आला.

संदेश सुनिल पाटील (वय १८, रा. कोल्हापूर नाका, कबनूर) हा ८ जुलैला रात्रीच्या सुमारास सांगली नाका येथून जात असताना एकाने त्याच्याकडे लिफ्ट मागितली. संदेश हा त्याला गाडीवरून घेऊन जात असताना रस्त्यात त्या व्यक्तीने गाड़ी थांबविण्यास सांगत मोपेडची चावी

काढून घेत संदेशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मारहाणीची धमकी देत त्याच्या खिशातील १२०० रुपये जबरदस्तीने काढून घेत गाडीसह पलायन केले होते. या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा प्रकार आदित्य भस्मे वाने केल्याची माहिती गोपनीय पथकाला मिळाली. त्यानुसार भस्मे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेली मोपेड व रोकड काढून दिली.

त्याचबरोबर त्याच्या ताब्यातील आणखीन एक चोरीची दुचाकी क चार गॅस सिलिंडर्स असा १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई श्रीकृष्ण दरेकर, अविनाश मुंगसे, सतिश कांबळे, रोहित डावाळे, अर्जुन फातले, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे, कमलाकर ढाले, श्रुत्वीक सोनवणे आदींच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -