बियर देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून हॉटल सिप्रेचर येथील कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. कल्पेश दिलीप भंडारी (वय ३१, रा. उरण, ता. वाळवा), अक्षय संजय शिंदे (वय २९), अनिकेत संजय शिंदे (वय २४, दोघे रा. कबनूर) व मुजमील समीर कर्नाजी (वय २५ रा. गांधी विकास नगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत युवराज मधुकर जामणेकर (वय ३५, रा. जवाहरनगर) याने फिर्याद दिली आहे.
गुरुवारी रात्री ११.३० वाजता कल्पेश, अक्षय, अनिकेत व मुजमील हे चौथे हॉटेल सिप्रेचर येथे गेले होते. त्यांनी तेथील कर्मचारी युवराज जामणेकर याच्याकडे बियर मागितली. त्यावर जामणेकर याने बार बंद झाल्याचे सांगत बियर देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अक्षय याने जामगेकर याच्या तोंडावर ठोसा लगावला तर अन्य तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये जामणेकर जखमी झाला.