Wednesday, September 17, 2025
Homeमहाराष्ट्रजिओच्या ग्राहकांची बल्ले-बल्ले, ‘या’84 दिवसांच्या प्लॅनमध्ये सर्व काही अनलिमिटेड

जिओच्या ग्राहकांची बल्ले-बल्ले, ‘या’84 दिवसांच्या प्लॅनमध्ये सर्व काही अनलिमिटेड

भारतात जिओचे 46 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन आणले आहेत. आज आपण जिओच्या 84 दिवसांच्या एका रिचार्ज प्लॅनची माहिकी जाणून घेणार आहोत, ज्याममध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह अनलिमिटेड 5G आणि इतर महत्वाचे फायदे मिळतात. या रिचार्ज प्लॅनबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

जिओचा 84 दिवसांचा खास प्लॅन

जिओचा 84 दिवस व्हॅलिडिटी असणारा रिचार्ज प्लॅन 1029 रुपयांच्या किमतीत येतो. या प्लॅनमध्ये युजर्स संपूर्ण भारतात अनलिमिटेड मोफत कॉलिंग आणि मोफत रोमिंगचा फायदा घेऊ शकतात. तसेच या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो, म्हणजेच युजर्सना एकूण 168 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो.

 

त्याचबरोबर युजर्सना दररोज 100 मोफत एसएमएसचा फायदाही मिळेल. त्याचबरो इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना काही ओटीटी अॅपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. यात अमेझॉन प्राइम व्हिडिओ, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउड अॅपचा मोफत अॅक्सेस मिळणार आहे.

 

जिओच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेता येणार आहे. मात्र यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेटही मिळेल.

 

1028 रुपयांचा आणकी एक प्लॅन

 

1029 रुपयांच्या प्लॅनव्यतिरिक्त Jio कडे 1028 रुपयांचा आणखी एक रिचार्ज प्लॅन देखील आहे, ज्यात युजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 2 GB हाय स्पीड डेटा अनलिमिटेड कॉलिंग, मोफत रोमिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात. मात्र या प्लॅनमध्ये युजर्सना Amazon Prime Video ऐवजी Swiggy चे प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळेल.

 

जिओचा वार्षिक प्लॅन

 

जिओने अनेक रिचार्ज प्लॅन सादर केले आहे. सध्या जिओचा एक वार्षिक प्लॅन लोकप्रिय आहे. ज्यामध्ये 365 दिवसांची वैधता मिळते, या प्लॅनची किंमत 3599 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी 365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सेवा देते. तसेच तुम्हाला दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात. जे युजर्स जास्त डेटा वापरतात त्यांच्यासाठी हा प्लॅन खास आहे. या प्लॅनमध्ये 912 जीबी पेक्षा जास्त डेटा मिळते. तुम्ही दररोज 2.5 जीबी डेटा वापरू शकता. जिओचा हा रिचार्ज प्लॅन 5 जी डेटा ऑपरेटरसह येतो. त्यामुळे कंपनीच्या पात्र ग्राहकांना अमर्यादित 5 जी डेटा मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -