Wednesday, July 16, 2025
Homeमहाराष्ट्र5 सेकंदात 100 चा टॉप स्पीड, एका चार्जिंगमध्ये 500 किमी प्रवास, टेस्लाच्या...

5 सेकंदात 100 चा टॉप स्पीड, एका चार्जिंगमध्ये 500 किमी प्रवास, टेस्लाच्या Y मॉडेलची किंमत किती?

इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात जगात आघाडीची कंपनी असलेल्या टेस्ला कंपनीने भारतात आपली स्मार्ट कार लाँच केली आहे. टेस्ला कंपनीने मुंबईतील बीकेसी (BKC) येथे आपले पहिले एक्स्पेरियन्स सेंटर सुरु केले आहे. या सेंटरचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. टेस्ला कंपनीकडून (Tesla Y Model Car) भारतात लाँच करण्यात येत असलेल्या इलेक्ट्रिक SUV – Model Y ची किंमतही जाहीर करण्यात आली आहे. टेस्लाने भारतासाठी आपली पहिली कार Model Y सादर केली असून, तिच्या किंमती अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ₹61.07 लाख असून, LR RWD व्हर्जनसाठी ही किंमत ₹69.15 लाख इतकी आहे. सध्या ही कार दिल्लीत, गुरुग्राममध्ये आणि मुंबईत उपलब्ध असून, कारची डिलिव्हरी 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपासून (Q3 2025) सुरू होणार आहे. या किंमती ऑन-रोड आहेत.

 

Model Y RWD व्हर्जन 0 ते 100 किमी प्रतितास वेग फक्त 5.6 सेकंदांत घेते. LR RWD व्हर्जनमध्ये 622 किमीचा ड्रायव्हिंग रेंज मिळते, तर स्टँडर्ड RWD व्हर्जनमध्ये सुमारे 500 किमी रेंज आहे. स्टँडर्ड व्हर्जनमध्ये 60kWh LFP बॅटरी आहे, तर LR व्हर्जनमध्ये 75kWh NMC बॅटरी मिळते. बुकिंग ₹22,000 मध्ये सुरू असून, ही रक्कम नॉन-रिफंडेबल आहे.

 

Tesla Y Model Car: टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्य काय?

* टेस्ला कंपनीची 3 RWD या मॉडेलची कार अवघ्या 5.6 सेकंदात शून्य ते 100 इतका वेग गाठू शकते.

* Tesla 3 LR RWD ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 622 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते.

 

* टेस्लाची स्टँटर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते.

 

* नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील रचनेत बदल करण्यात आले असून, आता मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शनदेखील देण्यात आले आहेत.

 

* Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरातही ती सर्वोच्च विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे.

 

* Model Y ची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7, आणि Mercedes-Benz EQA यांच्याशी होणार आहे. भारतात ही कार पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे किंमतीत वाढ झालेली आहे.

 

Tesla Y Model LR RWD Car: टेस्ला कारच्या कोणत्या रंगासाठी किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?

टेस्लाच्या Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ₹61.07 लाख असून, LR RWD व्हर्जनसाठी ही किंमत ₹69.15 लाख इतकी आहे. यानंतर आपल्या आवडीचा रंग हवा असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.

 

स्टेल्थ ग्रे

 

पर्ल व्हाइट मल्टी-कोट (₹95,000 अतिरिक्त)

 

डायमंड ब्लॅक (₹95,000 अतिरिक्त)

 

ग्लेशियर ब्लू (₹1,25,000 अतिरिक्त)

 

क्विक सिल्व्हर (₹1,85,000 अतिरिक्त)

 

अल्ट्रा रेड (₹1,85,000 अतिरिक्त)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -