सोशल मीडियावरुन नेहमीच समाजात तेढ निर्माण होत असते. अनेकदा यास जातीय रंग असल्याने दंगली झाल्याची प्रकरणं देखील घडली आहेत. व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने देखील देशात दंगली झालेल्या आहेत. आता एका तरुणाने त्याचा साखरपुडा झाल्यानंतर त्याची होणारी पत्नी अचानक प्रियकरासोबत पसार झाल्याने त्याला त्याची भयंकर शिक्षा मिळाली आहे. या तरुणाचे एका मुलीशी लग्न ठरले होते. आणि त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्यानंतर या दोघांचे लग्न देखील होणार होतं. परंतू या दरम्यान तरुणी अचानक तिच्या प्रियकरासोबत पसार झाली आणि त्या तरुणाने असे पाऊल उचलले की त्याला बेदम मारहाण करण्यात आली.
व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने आपल्या येथे अनेकदा जातीय दंगली घडल्या आहेत. आता धाराशिव येथे एका तरुणाचा साखरपुडा झाला. त्यानंतर आता लग्न होणार असल्याने आनंदात असलेल्या एका तरुणाला त्याची वागदत्त वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याने निराश व्हावे लागले. या निराशेच्या भरात त्याने तरुणाने विरहाच्या भरात तिचे धोका दिल्याचे स्टेटस व्हॉट्सअपला ठेवले. त्यामुळे या तरुणाला त्या मुलीकडच्या लोकांनी बेदम चोपल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
बायकोने धोका दिल्याचं स्टेटस ठेवलं …
साखरपुडा झाल्यानंतर ही तरुणी प्रियकरासोबत पळून गेल्याने हा तरुण नाराज झाला होता. त्या तरुणाने तिने धोका दिल्याचे स्टेटस आपल्या व्हॉट्सअपवर ठेवले होते. त्यात त्याने होणाऱ्या बायकोने धोका दिल्याचं म्हटलं होते. त्यावरुन या तरुणीच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्राने या तरुणला बेदम मारहाण केल्याचा प्रकार धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे घडला आहे. या तरुणावर आठ दिवसांपासून उपचार सुरू आहेत. हा तरुण तरुणीसह फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या तरुणाच्या पाठीवर जखमांचे वळ उमटले असून माराचे निळे लाल डाग उमटले आहेत.