Tuesday, July 15, 2025
Homeमहाराष्ट्र'या'भागात होणार जोरदार विजांचा कडकडाट अन् पाऊस जाणून घ्या हवामान

‘या’भागात होणार जोरदार विजांचा कडकडाट अन् पाऊस जाणून घ्या हवामान

महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरु होता, आता पावासाचा जोर काही दिवस ओसरला आहे. आता राज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाचीच शक्यता आहे.

 

अपवादा‍त्मक स्थितीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मे आणि जून महिन्यात पावसाने जोरदारा आगमन केलं होतं.

 

जुलै महिन्यातही पावसाचं पुनरागमन त्याच धडाक्यात झालं पण आता दहा जुलैपासून पाऊस थोडा संथ झाला आहे. आज आणि आगामी काळात पावसाची स्थिती कशी राहील हे जाणून घेऊया.

 

कोकण गोव्यात काल 14 जुलै रोजी बहुतांश , मध्य महाराष्ट्रात बऱ्याच विदर्भात काही तर मराठवाड्यात तुरळ ठिकाणी पाऊस झाला. आज 15 जुलै रोजी मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

 

काल 14 जुलैला नंदुरबार पालघर ठाणे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यांचा घाट विभागात तुरळ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता होती तिथे काही भागात पाऊसही पडला असून आजही धुळे नागपूर भंडारा गोंदिया जिल्हे आणि नाशिक जिल्ह्याचा उर्वरित भागात नंदुरबार धुळे नागपूर भंडारा गोंदियात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

 

16 जुलैला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटास ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वादळी वारे वाहण्याची शक्यता असून पाऊसही पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येथे पावसाची शक्यता असल्याने या सर्व जिल्ह्यात या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

पु्ण्यात कसे राहील हवामान

पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी आजपासून पुढील चार-पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहील. अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे, तर काल 14 जुलै रोजी घाटेक क्षेत्रामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

 

मुंबईत काय आहे पावसाची स्थिती?

 

१४ जुलैला रात्री मुंबई, ठाणे, पालघर येथे तुरळक ठिकाणी अधूनमधून मुसळधार पाऊस पडला तर आजही या भागात ढगाळ वातावरण असून हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -